गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण

By संजय पाठक | Updated: May 17, 2023 00:30 IST2023-05-17T00:25:02+5:302023-05-17T00:30:44+5:30

कार्यक्रमातील प्रकारानंतर पोलिसांकडून सौम्य छडीमार

Chaos at Gautami Patil Dance event in Nashik where photographers got beaten Police took action | गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण

गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण

संजय पाठक, नाशिक: नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम असून आज नाशिक शहरातील ठक्कर डोम  येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली तसेच दोन छायाचित्रकारांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रकार घडला.

नाशिक शहरातील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने ठक्कर डोम येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी हा प्रकार घडला. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसली तरी जमलेल्या लोकांनी हुल्लडबाजी केली तसेच छायाचित्र काढणाऱ्या  अशोक गवळी आणि व्हिडीओग्राफर आकाश येवले या दोन माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करून मारहाण केली पोलिसांनी हुल्लडबाजी रोखण्यासाठी सौम्य छडीमारही केला.

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे यापूर्वी आयोजित कार्यक्रमात देखील असाच गोंधळ झाला होता.

Web Title: Chaos at Gautami Patil Dance event in Nashik where photographers got beaten Police took action