हा ऑस्करच्या योग्यतेचा सिनेमा! 'बाईपण भारी देवा'चं विवेक अग्निहोत्रींकडून कौतुक, म्हणाले, "केदार शिंदेने ज्याप्रकारे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:24 IST2024-02-16T12:24:17+5:302024-02-16T12:24:43+5:30

'बाईपण भारी देवा' पाहून विवेक अग्निहोत्रीही भारावले! केदार शिंदेंचं कौतुक करत म्हणाले...

bollywood director vivek agnihotri praises kedar shinde baipan bhari deva film said its oscar worthy movie | हा ऑस्करच्या योग्यतेचा सिनेमा! 'बाईपण भारी देवा'चं विवेक अग्निहोत्रींकडून कौतुक, म्हणाले, "केदार शिंदेने ज्याप्रकारे..."

हा ऑस्करच्या योग्यतेचा सिनेमा! 'बाईपण भारी देवा'चं विवेक अग्निहोत्रींकडून कौतुक, म्हणाले, "केदार शिंदेने ज्याप्रकारे..."

२०२३मध्ये सर्वाधिक गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. सहा बहिणींची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाचं कौतुक केलं होतं. आता बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी 'बाईपण भारी देवा'साठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'बाईपण भारी देवा' सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. "मी काल 'बाईपण भारी देवा' सिनेमा पाहिला. असा सुंदर चित्रपट मी गेल्या कित्येक वर्षात पाहिलेला नाही. हा ऑस्कर विनिंग सिनेमा आहे. या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा. उत्कृष्ट अभिनय, उत्तम लेखन आणि भावनिक विषयाचं योग्यरित्या केदार शिंदेंकडून केलेलं दिग्दर्शन. केदारने टायमिंग आणि प्रत्येक छोटी गोष्ट मास्टर असल्याप्रमाणे हाताळली आहे. रोहिनी हट्टांगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी परब यांच्या कामासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या टीमला शुभेच्छा हा सिनेमा आताच पाहा आणि मला नंतर धन्यवाद द्या," असं विवेक अग्निहोत्रींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

केदार शिंदेंनी विवेक अग्निहोत्रींची ही पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. "थँक्यू सो मच सर", असं केदार शिंदेंनी म्हटलं आहे. 'बाईपण भारी देवा' सिनेमात रोहिनी हट्टांगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी परब यांच्या मुख्य भूमिका आहेत. ३० जून २०२३ला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा उपलब्ध आहे. 

Web Title: bollywood director vivek agnihotri praises kedar shinde baipan bhari deva film said its oscar worthy movie