बॉलिवूड अभिनेता पडला 'तू म्हणशील तसं'च्या प्रेमात; संकर्षणच्या नाटकाला लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:30 PM2023-03-13T16:30:00+5:302023-03-13T16:30:00+5:30

Sankarshan Karhade: सध्या संकर्षणचं तू म्हणशील तसं हे नाटक तुफान गाजताना पाहायला मिळतंय. या नाटकाचे राज्यभरात अनेक प्रयोग होत असून प्रत्येक प्रयोग हाऊसफूल ठरत आहे.

Bollywood actor fell in love with Marathi drama Attended the drama of Sankarshan Karhade tu mhanshil tas | बॉलिवूड अभिनेता पडला 'तू म्हणशील तसं'च्या प्रेमात; संकर्षणच्या नाटकाला लावली हजेरी

बॉलिवूड अभिनेता पडला 'तू म्हणशील तसं'च्या प्रेमात; संकर्षणच्या नाटकाला लावली हजेरी

googlenewsNext

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. म्हणूनच, अनेक बॉलिवूड कलाकारांना मराठी सिनेसृष्टीची भूरळ पडली असून अनेकांनी या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी धडपड करायचे. परंतु, आता बॉलिवूड कलाकार मराठी कलाविश्वाकडे आकर्षित होत असून मराठी कलाकारांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर 'गोलमाल'फेम अभिनेता शर्मन जोशी (sharman joshi) याचा फोटो व्हायरल होत आहे. शर्मनने चक्क मराठी नाटकाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याचा मालिका, सिनेमा, रिअॅलिटी, नाटक या सर्वच क्षेत्रात दांडगा वावर आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सध्या संकर्षणचं तू म्हणशील तसं हे नाटक तुफान गाजताना पाहायला मिळतंय. या नाटकाचे राज्यभरात अनेक प्रयोग होत असून प्रत्येक प्रयोग हाऊसफूल ठरत आहे. विशेष म्हणजे या नाटकाला चक्क एका बॉलिवूड कलाकाराने हजेरी लावली. संकर्षणने या अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत याविषयी माहिती दिली.

" तू म्हणशील तसं च्या कालच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत अंधारात कुणीतरी ओळखीचा चेहरा दिसला.. मी पहिल्या प्रवेशाच्या Exit नंतर आतून डोकवून पाहिलं तर; bollywood मधला लाडका, फेमस अभिनेता शर्मन जोशी आला होता.. पूर्ण प्रयोग त्यांनी मन लाउन पाहिला.. त्यांना नाटक खूssssप आवडलं .. खूप कौतुक पण केलं.. फार फार भारी वाटलं बघा.. स्टाईल, गोलमाल, ३ ईडियट्स सारख्या सिनेमांत पाहिलेला हा माणुस आपलं कौतुक करत होता.. मज्जा आली आणि काम तुम्ही कुठेही करा हो.. नाटकाशी जोडलेला माणुस नाटकाकडे येतोच", असं म्हणत संकर्षणने शर्मनसोबतचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, शर्मन जोशी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्याने ओटीटीवरही पदार्पण केलं आहे.
 

Web Title: Bollywood actor fell in love with Marathi drama Attended the drama of Sankarshan Karhade tu mhanshil tas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.