'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणच्या सिनेमाचा पार पडला मुहूर्त, दिसणार हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:58 IST2024-12-25T17:57:54+5:302024-12-25T17:58:41+5:30
Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणच्या सिनेमाचा पार पडला मुहूर्त, दिसणार हे कलाकार
'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण सातत्याने चर्चेत येत असतो. बऱ्याचदा त्याचे सोशल मीडियावरील रिल चर्चेत येत असतात. तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बिग बॉसमध्ये किताब जिंकल्यावर केदार शिंदेंनी सूरजसोबत सिनेमा बनवत असल्याची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव आहे 'झापुक झुपूक'. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी सिनेमातील इतर कलाकारदेखील उपस्थित होते.
नुकतेच 'झापुक झुपूक' चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी सर्व स्टारकास्ट हजर होती. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, पायल जाधव, जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि बेला केदार शिंदे करत आहेत.
अभिनेत्री दीपाली पानसरे हिने सोशल मीडियावर 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, मेनिफेस्ट मॅजिक, एका वेळी एक प्रतिष्ठित क्षण. केदार शिंदे सरांसोबत काम करण्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आणि शेवटी तो क्षण आला आहे. खूप खूप धन्यवाद केदार शिंदे आणि बेला शिंदे. तुम्हा सर्वांना 'झापुक झुपूक' टीम शुभेच्छा.