"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:44 IST2025-09-22T12:43:59+5:302025-09-22T12:44:20+5:30

भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे. 

bhushan pradhan revealed the secret behind ketaki narayan photos announced new film | "हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

मराठीतील हँडसम चॉकलेट बॉय म्हणून ओळख मिळवलेला आणि अनेक तरुणींचा क्रश असलेला अभिनेता भूषण प्रधानने काही दिवसांपूर्वीच गुडन्यूज दिली होती. अभिनेत्री केतकी नारायणसोबतचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये भूषणने केतकीसोबत मॅटर्निटी फोटोशूटसारख्या पोझ दिल्या होत्या. त्यामुळे खरोखरच त्याच्याकडे गुडन्यूज आहे की कोणत्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा हा भाग आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे. 

भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा तर झाले आहेत. पण, ते खऱ्या आयुष्यात नव्हे तर ऑनस्क्रीन पालक झाले आहेत. भूषण आणि केतकीचा 'तू माझा किनारा' हा नवा सिनेमा येत आहे. या सिनेमात ते मुख्य भूमिकेत आहेत.  सिनेमाचं पहिलं पोस्टर भूषणने शेअर केलं आहे. या सिनेमात बालकलाकार आणि सोशल मीडिया स्टार किया इंगळेही झळकणार आहे. 


"तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बरोबर ओळखलं आणि अनेकांना उत्सुकता होती. तर हो आम्ही खरंच पालक झालो आहोत पण स्क्रीनवर. आमचं गोड सरप्राइज मुक्ताला भेटा. पहिल्यांदाच आम्ही पालकाच्या भूमिकेत आहोत. हा प्रवास खुपच सुंदर आणि चॅलेजिंग होता. दोन तरुणांचा हा प्रवास जे पालक होण्यासाठी तयार नव्हते पण आयुष्याचे काही वेगळे प्लॅन्स होते", असं भूषणने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'तू माझा किनारा' हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Web Title: bhushan pradhan revealed the secret behind ketaki narayan photos announced new film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.