अश्विनी भावे आहेत निसर्गप्रेमी, पाहा त्यांचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:00 IST2019-04-20T14:52:50+5:302019-04-20T15:00:34+5:30
अश्विनी भावे ख-या अर्थाने निसर्ग प्रेमी आहेत.संस्कृती आणि निसर्ग याचा सुंदर मेळ घालून त्यांनी सातासमुद्रापार अमेरिकेत अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

अश्विनी भावे आहेत निसर्गप्रेमी, पाहा त्यांचे खास फोटो
1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. अश्विनी भावे ख-या अर्थाने निसर्ग प्रेमी आहेत.संस्कृती आणि निसर्ग याचा सुंदर मेळ घालून त्यांनी सातासमुद्रापार अमेरिकेत अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
अमेरिकेत आपल्या घराबाहेर निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवला आहे. त्याची माहिती त्या फेसबुकच्या माध्यमातून नेहमीच रसिकांशी शेअर करत असतात.या उपक्रमाला रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभतो आहे. आपल्या या उपक्रमाचा अश्विनी भावे यांना सार्थ अभिमान आहे.
नुकतेच त्यांनी गोव्यातील निसर्गाचा आनंद घेत असल्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.अश्विनी समुद्राच्या काठी निवांत क्षण घालवताना दिसतायेत. निसर्गाचे सौंदर्य कॅमे-यात टीपत आपला हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे.
अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत.