"त्याने खूप कष्ट केलेत, पण...", सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ यांचं स्पष्ट मत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:24 IST2026-02-15T15:20:39+5:302026-02-15T15:24:10+5:30

सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मात्र अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत आता अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ashok saraf talk about trolling of marathi actor sachin pilgaonkar said he had done so many things | "त्याने खूप कष्ट केलेत, पण...", सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ यांचं स्पष्ट मत, म्हणाले...

"त्याने खूप कष्ट केलेत, पण...", सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ यांचं स्पष्ट मत, म्हणाले...

सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अभिनयासोबतच त्यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी विश्वातही त्यांनी नाव कमावलं आहे. खूप कमी वयापासूनच सचिन पिळगावकर यांनी अभिनय करायला सुरुवात केली होती. इतकी वर्ष ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. मात्र अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत आता अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगबाबत 'मुंबई तक'शी बोलताना अशोक सराफ म्हणाले, "निश्चितच वाईट वाटतं. कारण त्याने जे मिळवलंय ते सहजासहजी मिळवलेलं नाहीये. त्यासाठी त्याने कष्ट केलेत. त्याने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आहे. तरुणपणीच त्याने दिग्दर्शन केलंय. त्याने संगीतसुद्धा दिलंय. त्याला एडिटिंगही येतं. हे सगळे प्रकार तो स्वत: शिकला आहे. तो काय बोलतो त्याच्यावरुन त्याला ट्रोल केलं जातं. त्याच्या ज्ञानावर त्याचं ट्रोलिंग होत नाही. ज्ञानावर ट्रोल करा...एकाला तरी जमेल का? कारण तो काय करतोय किंवा काय नाही, हे त्यांना माहितच नाही. ट्रोलिंग करणं हा एक छंद झाला आहे. ट्रोल करून लोक विसरून जातात. काही जण तर तेच शोधत असतात की हा कुठे काय बोलतोय का किंवा सापडतोय का...". 

दरम्यान, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी ८०-९०च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, आमच्यासारखे आम्हीच, नवरा माझा नवसाचा अशा अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र दिसली. 

Web Title : अशोक सराफ ने सचिन पिलगांवकर को ट्रोल करने वालों का किया बचाव, राय व्यक्त की।

Web Summary : अशोक सराफ ने सचिन पिलगांवकर का बचाव करते हुए उनकी ट्रोलिंग की आलोचना की। उन्होंने पिलगांवकर की कड़ी मेहनत, निर्देशन और संगीत जैसी विविध प्रतिभाओं पर प्रकाश डाला और जोर दिया कि ट्रोलिंग अक्सर निराधार और अज्ञानतापूर्ण होती है। सराफ और पिलगांवकर ने कई लोकप्रिय फिल्मों में साथ काम किया है।

Web Title : Ashok Saraf defends Sachin Pilgaonkar against trolling, expresses his opinion.

Web Summary : Ashok Saraf defends Sachin Pilgaonkar, criticizing his trolling. He highlights Pilgaonkar's hard work, diverse talents like directing and music, and emphasizes that trolling is often baseless and ignorant. Saraf and Pilgaonkar have worked together in several popular films.