अशोक सराफ यांनी वाजवली डफली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:03 IST2025-09-07T12:03:04+5:302025-09-07T12:03:50+5:30

अशोक सराफ हे या व्हिडीओमध्ये हातात डफली घेऊन ती वाजवताना दिसत आहेत.

Ashok Saraf Played The Tambourine Dafli Watch Video | अशोक सराफ यांनी वाजवली डफली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अशोक सराफ यांनी वाजवली डफली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आजही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग असून, प्रत्येक चाहत्याच्या मनात त्यांनी एक खास जागा निर्माण केली आहे. सध्या ते 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अशोक मा. मा.' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेतील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतंय. नुकताच या मालिकेच्या सेटवरून त्यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

अशोक सराफ हे त्यांच्या सहज वागण्यामुळे आणि साधेपणामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या जवळचे राहिले आहेत. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अशोक सराफ हातात डफली घेऊन ती वाजवताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान काढलेला हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांचा हा निराळा अंदाज पाहून अनेकजण त्यांच्यावर फिदा झाले आहेत.


अशोक आता ७८ वर्षांचे आहेत. तरीही ते सळसळत्या एनर्जीने काम करत आहेत. 'अशोक मा. मा.' या मालिकेतून अशोक सराफ यांनी १८ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलंय.  अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा पाहायला मिळतात. ही मालिका तुम्ही दररोज रात्री ८:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. तर आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Ashok Saraf Played The Tambourine Dafli Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.