व्याख्या, विख्खी, वुख्खू! हे तीन शब्द सुचले कसे?, अशोक सराफ यांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:57 IST2025-04-26T11:55:39+5:302025-04-26T11:57:50+5:30

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर येतात ते अशोक सराफ. हा डायलॉग आहे धुमधडाका सिनेमातील.

Ashok Saraf marathi movie Dhoom Dhadaka famous dialogue vyakhya vikhkhi vukhkhu inside story | व्याख्या, विख्खी, वुख्खू! हे तीन शब्द सुचले कसे?, अशोक सराफ यांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

व्याख्या, विख्खी, वुख्खू! हे तीन शब्द सुचले कसे?, अशोक सराफ यांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर येतात ते अशोक सराफ. हा डायलॉग आहे 'धुमधडाका' सिनेमातील (Dhoom Dhadaka Movie). या चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासोबत महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) मुख्य भूमिकेत आहेत. यातील हा प्रसिद्ध डायलॉग एका मजेशीर किस्स्यातून तयार झाला आहे. या संवादामागचा भन्नाट किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला आहे. 

अशोक सराफ यांनी मॅजिक १०६ एफएमला दिलेल्या मुलाखतीत व्याख्या, विख्खी, वुख्खू या डायलॉगमागचा भन्नाट किस्सा सांगितला. त्यात अशोक मामा म्हणाले की, व्याख्या, विख्खी, वुख्खू हा डायलॉग इतका प्रसिद्ध होईल, असं वाटलंदेखील नव्हतं. त्यावेळेला माझ्याकडून चुकून झालेली ती अॅक्शन होती. ती कन्टिन्यू केली पुढे. व्याख्या, विख्खी, वुख्खू कुठून निघतं? हे स्क्रीप्टमध्ये लिहिलेलं नव्हतं. ते माझं मीच बोललो होतो. जेव्हा धनाजीराव वेष बदलून येतो. मुलाचा बाप बनून येतो तेव्हा तो गेटअप बदलला आणि त्याच्या हातात पाइप दिला. पाइपमधला तंबाखू ओढणे खूप कठीण असतो. तो घश्याला लागतो. समोर शरद तळवळकर उभे होते. मी तोंडात पाइप पकडून काय वाकडोजी धने असा डायलॉग बोलतो. त्यांचं नाव मी कधीच सरळ घेतलं नाही. धणेजी वाकडे काय वाटेल ते नाव घ्यायचो. मी बोललो माळी बुवा आणि तंबाखू घशाला बसला. तेव्हाच माझ्या तोंडून व्याख्या असं शब्द बाहेर पडला. मग तिथे कट म्हटलं. पण त्यावेळी डोक्यात आलं की हेच कन्टिन्यू केलं तर मग मी ते डायलॉग बोललो.  

वर्कफ्रंट
अशोक सराफ सध्या अशोक मा.मा. मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा अशी ही जमवा जमवी हा सिनेमा भेटीला आला. यात त्यांच्यासोबत वंदना गुप्ते, सुनील बर्वे आणि चैत्राली गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश गुप्तेने केले आहे. या सिनेमात तीन पिढ्यांच्या नात्यांची आणि त्यांच्यातील मजेदार गोष्ट सादर करण्यात आलीय.

Web Title: Ashok Saraf marathi movie Dhoom Dhadaka famous dialogue vyakhya vikhkhi vukhkhu inside story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.