'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:05 IST2025-07-19T14:04:23+5:302025-07-19T14:05:10+5:30

'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) 1988 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. यातील डायलॉग्स तर आजही प्रत्येकाला पाठ असतील. पण या सिनेमाचं शूटिंग नेमकं कुठे झालंय, तुम्हाला माहित्येय का?

'Ashi Hi Banwa Banvi' was shot here, but where is Leelabai Kalbhor's bungalow? Find out | 'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) १९८८ साली रिलीज झालेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. यातील डायलॉग्स तर आजही प्रत्येकाला पाठ असतील. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सिद्धार्थ रे या सर्व कलाकरांनी धमाल आणली. आजही सिनेमाची तितकीच आठवण काढली जाते. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीनं पाहिला जातो. पण या सिनेमाचं शूटिंग नेमकं कुठे झालंय, तुम्हाला माहित्येय का?

'अशी ही बनवा बनवी' सिनेमाचं जास्त शूटिंग हे पुण्यात झालं आहे. सिनेमात दाखवण्यात आलेला पाषाणरोड अजूनही पुण्यात आहे. पाषाण रोडवर दाखवण्यात आलेला लीलाबाई काळभोर यांचा बंगला हा सेट होता. तर अशोक सराफ आणि अश्विनी भावेंचं दाखवलेलं दुकान हे सचिन पिळगावकर यांच्या मित्राचं होतं. त्यांनी ते शूटिंगसाठी दिलं होतं.

पुण्याशिवाय या ठिकाणी झालंय शूटिंग

'हृदयी वसंत फुलताना' हे गाणं एकाच ठिकाणी शूट न करता पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलं होतं.सिनेमातील काही सीन्स पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुख्य बिल्डिंगमध्ये शूट केले होते. पुण्याशिवाय काही सीन्स कोल्हापूरमध्येही चित्रीत केल्याचंही सांगण्यात येतं.  

Web Title: 'Ashi Hi Banwa Banvi' was shot here, but where is Leelabai Kalbhor's bungalow? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.