डॅडींना टक्कर देण्यासाठी शकीलची एन्ट्री; 'दगडीचाळ 2' मध्ये नवं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:04 IST2022-08-17T17:03:39+5:302022-08-17T17:04:57+5:30
Daagdi chawl 2: डॅडींना टक्कर देण्यासाठी चित्रपटात एका नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे.

डॅडींना टक्कर देण्यासाठी शकीलची एन्ट्री; 'दगडीचाळ 2' मध्ये नवं राजकारण
Daagdi Chawl 2: मुंबई गँगवॉरमधील सर्वात मोठं नाव म्हणजे ‘अरुण गवळी’ उर्फ ‘डॅडी’. त्यांच्या ‘दगडी चाळी’वर आधारित असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. त्यामुळेच या चित्रपटाचा पुढील भाग ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chawl 2) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीचे अनेक अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. यामध्येच आता डॅडींना टक्कर देण्यासाठी चित्रपटात एका नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे.
आतापर्यंत 'दगडी चाळी'मध्ये सूर्या, सोनल आणि डॅडी यांच्याभोवती चित्रपटाची कथा फिरत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता या तिघांमध्ये शकील या नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. डॅडींना टक्कर देण्यासाठी येणारा हा शकील चित्रपटाला एक वेगळं वळण देणार आहे. 'दगडी चाळ 2' मध्ये शकीलची भूमिका अभिनेता अशोक समर्थ (Ashok Samarth) साकारणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटातील नवा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.
'दगडी चाळ २' ह्या चित्रपटात 'सूर्या' (ankush chaudhari) ,'डॅडी' (makrand deshpande) ,'सोनल' (pooja sawant) यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे 'शकील'. 'सूर्या' आणि 'डॅडी' या दोघांच्या वादात आता 'शकील' कहाणीला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. म्हणतात ना वैऱ्याचा वैरी म्हणजे मित्र हीच डोकॅलिटी वापरून 'शकील'ने मारलेली कमाल एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे. 'डॅडी' ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवतो? हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, शकीलने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? याचं उत्तर येत्या १९ ऑगस्टला चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहे. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी (सूर्या), पूजा सावंत (सोनल), मकरंद देशपांडे (डॅडींच्या ) भूमिकेत असून (शकील) च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत.