बँक बॅलेन्सच्या दुप्पट मिळत होते पैसे तरीही अमृता सुभाषने का नाकारली भूमिका? म्हणाली- "मी नकार दिला कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:53 IST2025-09-04T12:53:02+5:302025-09-04T12:53:27+5:30
एका भूमिकेसाठी भरभक्कम मानधन मिळत असूनही अभिनेत्रीने भूमिकेला स्पष्ट नकार दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृताने यामागचं कारण सांगितलं.

बँक बॅलेन्सच्या दुप्पट मिळत होते पैसे तरीही अमृता सुभाषने का नाकारली भूमिका? म्हणाली- "मी नकार दिला कारण..."
अमृता सुभाष ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. अभिनयाच्या जोरावर तिने केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अमृताने अनेक सुपरहिट सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. प्रत्येकवेळी ती एका वेगळ्या भूमिकेत दिसली. पण, एका भूमिकेसाठी भरभक्कम मानधन मिळत असूनही अभिनेत्रीने भूमिकेला स्पष्ट नकार दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृताने यामागचं कारण सांगितलं.
अमृताने नुकतीच मनी कंट्रोलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला "एक विशिष्ट भूमिका साकारल्यानंतर तशाच पद्धतीच्या भूमिका ऑफर होतात. टाइपकास्ट केलं जातं. अशावेळी भूमिकेला नकार दिला आहेस का?" असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमृता म्हणाली, "हो, पण जर कंटेट चांगला असेल तर मी टाइपकास्ट होण्याचा फारसा विचार करत नाही. हा पण मी अशी भूमिका नाकारली आहे ज्यासाठी मला चांगले पैसे मिळत होते. माझ्या बँक बॅलेन्सपेक्षा दुप्पट मानधन ते मला देत होते. पण, त्या भूमिकेत मला वेगळं काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे मी भूमिकेला नकार दिला".
"पण, जर कंटेट चांगला असेल तर खूप गोष्टींचा विचार मी करत नाही. मी अशा सिनेमांनाही नाकार दिला आहे ज्यासाठी मला चांगले पैसे मिळत होते. पण, त्यात काहीच नाविन्य नव्हतं. पण, जर जारण सिनेमासारखा कंटेट असेल तर छोटं प्रोडक्शन असूनही मी सिनेमा करते. मी जितके पैसे घेते तेवढे ते मला देऊ शकत नाहीत. पण, तरीही मी करते कारण कंटेट चांगला असतो", असंही अमृता पुढे म्हणाली.