'लालबागचा राजा'ला अमृता खानविलकरकडून खास दान, बाप्पाच्या चरणी अर्पण केली खास वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:30 IST2025-09-03T13:29:46+5:302025-09-03T13:30:09+5:30
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. अमृताने बाप्पाच्या चरणी खास वस्तूही अर्पण केली.

'लालबागचा राजा'ला अमृता खानविलकरकडून खास दान, बाप्पाच्या चरणी अर्पण केली खास वस्तू
गणेशोत्सवामुळे संपूर्ण वातावरण आनंददायी झालं आहे. सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक सेलिब्रिटी जात असतात. यंदाही पहिल्या दिवसापासूनच लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटी राजाच्या दरबारात हजर होते. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. अमृताने बाप्पाच्या चरणी खास वस्तूही अर्पण केली.
अमृताने नुकतंच राजाच्या दरबारात जाऊन लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. यावेळी तिने साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीने बाप्पाच्या चरणी खास वस्तू अर्पण केली. अमृताने लालबागचा राजाला खास दान दिलं आहे. चांदीच्या दुर्वा अभिनेत्रीने बाप्पाच्या चरणी अर्पण केल्या. लालबागचा राजाच्या दर्शनावेळीचा अमृताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, अमृता ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीच्या या चंद्रमुखीने बॉलिवूडही गाजवलं आहे. अनेक हिंदी सिनेमांतही तिने काम केलं आहे. 'चंद्रमुखी' या सिनेमामुळे अमृता प्रसिद्धीझोतात आली. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अमृताचा चाहता वर्ग मोठा असून ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.