याचे सारे श्रेय प्रेक्षकांचं 'वेड'च्या यशावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 21:09 IST2023-04-26T20:25:31+5:302023-04-26T21:09:42+5:30
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले

याचे सारे श्रेय प्रेक्षकांचं 'वेड'च्या यशावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया
वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुखला 'वेड' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या विशेष पुस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी रितेश देशमुखने लोकमतचे मनापासून आभार मानले.
यावेळी रितेशची छोटेखानी मुलाखत घेण्यात आली. . वेड आधी आणि वेडनंतर रितेशला काय फरक पडला यावर उत्तर देताना तो म्हणाला, ''तसा काहीच फरक पडलेला नाही. वेडचं सारं श्रेय प्रेक्षकांचं आहे. मला नेहमी असं वाटतं मराठी चित्रपटाने खूप स्पर्धा आहेत. मराठी चित्रपटाना स्क्रिन मिळतं नाहीत. पण मी लोकमतचा खूप खूप आभारी आहे त्यांनी मराठी चित्रपटांना डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात.''
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. या चित्रपटातील गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आणि पाठोपाठ चित्रपटही डोक्यावर घेतला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नुसता धुमाकूळ घातला. थिएटरनंतर आता प्रेक्षकांना पुन्हा रितेश-जिनिलियाची केमिस्ट्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.