"...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:27 IST2025-04-11T16:27:20+5:302025-04-11T16:27:59+5:30

अलका कुबल या बहुगुणी, संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

Alka Kubal On Sexual Harassment Demanded Strict Laws Like Gulf Countries | "...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या?

"...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या?

Alka Kubal: ९०च्या दशकात मराठी सिनेसृष्टीतील नायिकाप्रधान चित्रपटांचं पर्व गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये. अजूनही त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत.मराठी रसिक प्रेक्षक अलका कुबल यांच्यात आपली मुलगी, सून, ताई, आई हे नातं पाहत आले आहेत. अलका कुबल या बहुगुणी, संवेदनशील  अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या सामजिक समस्यांवर परखडपणे मत मांडताना दिसून येतात. नुकतंच अलका कुबल या खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं  जळगावमध्ये पोहचल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य केलं. आपल्या देशात आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत, असं त्यांनी म्हटलं. 

कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांवर एबीपी माझाशी बोलताना अलका कुबल म्हणाल्या, "आपण ना नुसतं पोलिसांना दोष देतो. मला असं वाटतं ना बऱ्याचवेळा आजूबाजूचे लोकही जबाबदार आहेत. बऱ्याचवेळा आपण पाहतो की अशा घटना या घरामध्ये घडत असतात. कुणाचा चुलत भाऊ असतो तर कुणाचा आतेभाऊ असतो. गेल्या महिन्यात तर मी एक बातमी वाचली की वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते. मला असं वाटलं त्या चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला हवा होता. एवढं चिडायला होतं".

 त्या म्हणाल्या, "अगदी आपल्याकडे कडक शिक्षा व्हायला पाहिजे. जशा शिक्षा सौदीत दिल्या जातात, तशा शिक्षा व्हायला हव्यात.  कायद्याची भीती वाटायला पाहिजे. आजूबाजूचे लोक , यात महिलासुद्धा घटना होत असताना अरे आपला काय संबंध असं म्हणतं त्यामध्ये पडत नाही.  पुण्यात एका मुलीवर हल्ला होत असताना दोन मुलं धावत आली आणि त्यांनी तिला वाचवलं. अशा मुलांचं कौतुक वाटत. कौतुक वाटलं मला त्यांचं. तर अशा घटना घडतात, तेव्हा जमाव आला तर त्यांची हिंमत होणार नाही".


पुढे त्या म्हणाल्या, "जो बाप एवढा नालायक असू शकतो, जो आपल्या मुलीवर बलात्कार करतोय, त्या बापाला का सोडायचं. कायद्याची शिक्षा तरी कडक व्हायला पाहिजे. चार वर्ष तुरुंगात जाणार आणि मग पुन्हा बाहेर येणार, काय अर्थ आहे का त्या गोष्टीला. पुन्हा त्याच तेच सुरू. जो चारही मुलींचा वापर करतो, असा बाप असेल तर काय म्हणायचं त्याला. किती दगडाचं काळीज ते", या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. 
 

Web Title: Alka Kubal On Sexual Harassment Demanded Strict Laws Like Gulf Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.