Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:51 IST2025-05-03T17:50:52+5:302025-05-03T17:51:45+5:30

Alka Kubal: अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) सध्या त्यांच्या वजनदार नाटकामुळे चर्चेत आल्या आहेत. या नाटकात त्या हटके भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मात्र आजही त्या 'माहेरची साडी' (Maherchi Sadi Movie) या सिनेमासाठी ओळखल्या जातात.

Alka Kubal had taken only this much remuneration for 'Maherchi Sadi' Movie, the first salary figure also came to light | Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) सध्या त्यांच्या वजनदार नाटकामुळे चर्चेत आल्या आहेत. या नाटकात त्या हटके भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मात्र आजही त्या 'माहेरची साडी' (Maherchi Sadi Movie) या सिनेमासाठी ओळखल्या जातात. आपल्या सहज सुंदर अभिनयानं आणि बोलक्या डोळ्यांनी अलका कुबल यांनी प्रेक्षकांनाही ढसाढसा रडवलं होतं. महिला वर्गाने तर हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. पण तुम्हाला माहित्येय का, या सिनेमासाठी अभिनेत्रीने किती मानधन घेतलं होतं ते. चला तर मग जाणून घेऊयात.

खरेतर अलका कुबल यांनी माहेरची साडी हा सिनेमा सुरूवातीला कमी मानधनामुळे नाकारला होता. पण नंतर त्यांनी तो स्वीकारला. या सिनेमामुळे त्यांचे दिवस बदलल्याचे ते आवर्जुन सांगतात. नुकतेच अलका कुबला यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी माहेरची साडी सिनेमाच्या मानधनाबद्दल आणि त्यांच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, माझी सर्वात पहिली कमाई ५००० हजार रुपये होते. नटसम्राट नाटकाच्या वेळी मी बालकलाकार होते त्यावेळी मला २५ रुपये नाइट मिळायचे. मग त्याचे ५० रुपये झाले. सिनेमात ५००० रुपये मानधन होते. मग १२०००, १३००० झाले. मग ५० हजारांपर्यंत पोहचले. पण माहेरची साडीनंतर खरे दिवस बदलले. त्यानंतर मी जास्त मानधन घेणारी नायिका होते. 

''अलका कुबल यांना या सिनेमासाठी नव्हती पहिली पसंती''

खरेतर या चित्रपटासाठी अलका कुबल यांना पहिली पसंती नव्हती. बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीला दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ऑफर केली होती. पण तिने ती भूमिका नाकारली. त्यानंतर या चित्रपटासाठी एन.एस. वैद्य आणि पितांबर काळे यांनी या भूमिकेसाठी अलका कुबल यांचे नाव सुचवले. खरेतर विजय कोंडकेंना अलका कुबल या भूमिकेसाठी नको होती. पण त्या दोघांच्या सांगण्यावरून ते अभिनेत्रीला भेटले. त्यावेळी अलका कुबल चित्रपटासाठी ७५ हजार रुपये मानधन घेत होत्या. पण माहेरची साडी या सिनेमासाठी फक्त १८ हजार रुपये मानधन असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी हा सिनेमा नाकारला होता. पण नंतर पितांबर काळे यांच्या शब्दाखातर त्यांनी या सिनेमात काम करण्यास होकार दिला. 

'माहेरची साडी'साठी अभिनेत्रीला दिलं कमी मानधन

अलका कुबल यांनी सांगितले की, त्यावेळी माझे जवळजवळ २५-३० सिनेमे प्रदर्शित झालेत. माझी एक इमेज बनली म्हणून विजय कोंडके यांना मी त्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हते. परंतु पितांबर काळे आणि एन एस वैद्य विजय कोंडके यांना सारखे सांगत होते की तुम्ही या भूमिकेसाठी अलकालाच घ्या. एकदा तुम्ही तिला भेटा. मग आम्ही विजय कोंडके यांच्या घरी शिवाजी पार्कला गेलो आणि त्यांना भेटलो. कथानक आणि भूमिका आवडण्यासारखीच होती आणि त्यावेळी काम येणं आणि स्वीकारणं असंच होतं. त्यावेळी चॉइस नव्हता. दादा कोंडकेंचा आशीर्वाद होता त्या चित्रपटाला त्यामुळे नाही बोलूच शकत नव्हते. पण त्या सिनेमाचं मानधन खूप कमी होते. त्यामुळे मी बाहेर ७५००० रुपये मानधन घेत होते आणि हा सिनेमा मी फक्त १८ हजार रुपये मानधनात केला. मला कसंतरी झालं. कुठे ७५ हजार नाही तर किमान ५० हजार तरी मिळाले हवेत. मी नाही म्हटलं आणि बाहेर आले. मग पितांबर काळे माझ्या मागून आले आणि म्हणाले नाही अलका, यावेळी तू माझे शब्द ऐक. तू हा चित्रपट माझ्यासाठी कर. त्यांनी मला त्या सिनेमासाठी मनवलं. या चित्रपटानंतर तुझं आयुष्य बदलेल. शेवटी मी त्यांच्या शब्दाखातर आत गेले आणि सिनेमा साइन केला. त्यांचे शब्द खरे ठरले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मी आता कितीही काम केलं असलं तरी अजूनही माहेरची साडीची ओळख पुसली गेलेली नाही.   

Web Title: Alka Kubal had taken only this much remuneration for 'Maherchi Sadi' Movie, the first salary figure also came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.