'परश्या'चं लग्न? मुंडावळ्या बांधून पोस्ट केला फोटो; चाहती म्हणाली, 'मी तयार आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 10:37 IST2023-03-26T10:36:38+5:302023-03-26T10:37:51+5:30

पांढऱ्या रंगाची शेरवानी, मोठे केस, गळ्यात हार आणि मुंडावळ्या बांधून आकाशने काही वेळापूर्वीच फोटो पोस्ट केला आहे.

akash thosar sairat fame actor posts photo in groom attire saying must come fans comments | 'परश्या'चं लग्न? मुंडावळ्या बांधून पोस्ट केला फोटो; चाहती म्हणाली, 'मी तयार आहे...'

'परश्या'चं लग्न? मुंडावळ्या बांधून पोस्ट केला फोटो; चाहती म्हणाली, 'मी तयार आहे...'

'परश्या' याच नावाने लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश ठोसरची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आकाश ठोसर आता आगामी 'घर बंदुक बिरयानी' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आकाशचा सिनेमा म्हणलं की तरुणी तर आकर्षित होणारच. हा सिनेमा देखील नागराज मंजुळेचाच आहे. नुकताच आकाशने मुंडावळ्या बांधलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे आकाश लग्न करतोय की काय या चर्चेला उधाण आलं आहे. नक्की खरं काय बघुया

पांढऱ्या रंगाची शेरवानी, मोठे केस, गळ्यात हार आणि मुंडावळ्या बांधून आकाशने काही वेळापूर्वीच फोटो पोस्ट केला आहे.  फोटोतील त्याच्या स्माईलवर तरुणी फिदा झाल्या आहेत. तर दुसऱ्या फोटोत तो गॉगल खाली करुन स्टाईल मारताना दिसतोय. 'जमलंय बरं का...यायला लागतंय. १० दिवस बाकी' असं कॅप्शनही त्याने दिलं आहे. आता आकाश मुंडावळ्या बांधून गुडघ्याला बाशिंग बांधायला तर तयार झाला नाही ना असा प्रश्न सर्वांना पडला असेल. 

परश्याची हटके हेअरस्टाईल, म्हणाला, 'घर बंदुक बिरयानी' साठी दीड वर्ष...'

आकाशच्या या फोटोवर 'नवरीचं नाव काय' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 'मी तयार आहे येऊ का' अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. मात्र आकाशचा हा फोटो म्हणजे लग्नासाठी आमंत्रण नसून त्याच्या सिनेमाचं प्रमोशनच आहे. त्याचा हा 'घर बंदुक बिरयानी' मधला लुक आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी केवळ १० दिवस राहिले असून सिनेमाला यायला लागतंय असं तो म्हणत आहे.

Web Title: akash thosar sairat fame actor posts photo in groom attire saying must come fans comments