सह्याद्रीमध्ये 'परश्या'ची स्टंटबाजी, खळाळत्या धबधब्यावरुन आकाशने मारली उडी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:05 IST2023-07-23T13:04:20+5:302023-07-23T13:05:39+5:30
आकाश एका उंच ठिकाणी उभा असून तिथून खाली धबाधबा कोसळत आहे.

सह्याद्रीमध्ये 'परश्या'ची स्टंटबाजी, खळाळत्या धबधब्यावरुन आकाशने मारली उडी; Video व्हायरल
'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) गावाच्या मातीत वाढलेला आहे. अभिनेता होण्याआधी तो कुस्तीच्या आखाड्यात जाणारा रांगडा पहेलवान होता. मात्र सैराट मुळे त्याचं नशीब पालटलं नाहीतर आज आकाश कुस्ती करत असता असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनेता असला तरी त्याच्या अंगात असलेली स्टंटबाजी काही कमी नाही. नुकतंच त्याने खळखळ वाहणाऱ्या उंट धबधब्यावरुन उडी मारत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आकाशचा खळाळत्या धबधब्याठिकाणी रॅपलिंग करतानाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
आकाशने त्याच्या सोशल मीडियावर सह्याद्री पर्वतरांगेत रँपलिग करतानाचा थरारक व्हिडिओ शेअर केला आहे. हिरवीगार झाडी, उंचच उंच पर्वतरांगा आणि त्यातून खळखळ वाहणारे धबेधबे असे सुंदर दृश्य त्याने शेअर केले आहे. यात आकाश एका उंच ठिकाणी उभा असून तिथून खाली धबाधबा कोसळत आहे. आकाश लांब दोरी खाली सोडतो आणि सुरु होतो रॅपलिंगचा थरार. त्याने पोस्ट केलेला हा व्हिडिओ अक्षरश: अंगावर काटा आणणारा आहे.
आकाश लवकरच रवी जाधव यांच्या आगामी 'बाल शिवाजी' सिनेमात दिसणार आहे. रवी जाधव यांनी आकाशच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, 'तयारी जोरदार सुरु आहे'. तर अमृता खानविलकर, संस्कृती बालगुडे यांनीही कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर आकाश काळजी घे स्टंट करु नको म्हणत चाहत्यांनी त्याला सल्ला दिला आहे. 'हेच खरे शिवरायांचे मावळे' असं म्हणत एका चाहत्याने त्याचं कौतुकही केलंय.