आमिरच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीत आर्ची-परश्याला पाहून नेटकरी 'सैराट', आकाश ठोसर आणि रिंकूचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 08:43 AM2024-01-14T08:43:22+5:302024-01-14T08:43:48+5:30

आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसले आकाश-रिंकू, फोटोसाठी एकत्र दिल्या पोझ

akash thosar and rinku rajguru attend aamir khan daughter ira khan nupur shikhare wedding reception party video | आमिरच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीत आर्ची-परश्याला पाहून नेटकरी 'सैराट', आकाश ठोसर आणि रिंकूचा व्हिडिओ व्हायरल

आमिरच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीत आर्ची-परश्याला पाहून नेटकरी 'सैराट', आकाश ठोसर आणि रिंकूचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली.  मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आयरा आणि नुपूरने उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर आयरा आणि नुपूरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडलं. आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला सिनेजगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील सितारेही आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत दिसून आले. 

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूदेखील आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत दिसले. आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये आर्ची-परश्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वेडिंग रिसेप्शन पार्टीतील त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आकाश आणि रिंकू फोटोसाठी पापाराझींना पोझ देताना दिसत आहेत. फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

आयराच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी रिंकूने मराठमोळ्या लूकमध्ये दिसून आली. निळ्या रंगाची साडी नेसून रिंकूने सिंपल लूक केला होता. तर आकाशने काळ्या रंगाचा सूट घातला होता. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र सैराट झाले आहेत. एकाने कमेंट करत "यांच्यात काहीतरी सुरू आहे", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "आर्ची-परश्या" अशी कमेंट केली आहे. "छान जोडी" असंही एकाने म्हटलं आहे. 

दरम्यान, आमिरचा जावई नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह तो आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर राहिलेला आहे. आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: akash thosar and rinku rajguru attend aamir khan daughter ira khan nupur shikhare wedding reception party video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.