Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:15 IST2026-04-12T13:12:50+5:302026-04-12T13:15:14+5:30

Asha Bhosale Passes Away: आशा भोसले यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने भावुक पोस्ट लिहिली

after Asha Bhosale Death Son anand bhosale give Important information about the singer funeral | Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती

Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती

भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालंय. वयाच्या ९३ व्या वर्षी आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर आणि आशाताईंच्या कुटुंबियांनी या बातमीची पुष्टी केली. या प्रसंगी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आशा भोसलेंच्या निधनाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय आशा भोसलेंच्या मुलाने भावुक प्रतिक्रिया दिली असून गायिकेच्या अंत्यसंस्काराबाबत महत्वाची माहिती दिली.

वृत्तवाहिनींशी बोलताना आशाताईंच्या मुलाने भावुक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले- ''मी आनंद भोसले,  माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. उद्या सकाळी ११ वाजता आई जिथे राहत होती त्या लोअर परेल येथील निवासस्थानी तुम्ही त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकता. उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.'' 

''आशा भोसले यांचं त्याच्या निवासस्थानी ११ ते ३ वाजेपर्यंत त्यांच्या चाहत्यांना अंतिम दर्शन घेता येईल. पुढे दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.'', अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली.




ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले आहे. आशा यांना  छातीचा संसर्ग झाल्याने हृदयावर ताण येऊन घरीच हृदयविकाराचा झटका आला. काही वेळ त्या बेशुद्धास्थेत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सुरुवातीला त्यांना सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title : आशा भोसले का निधन: बेटे की भावुक प्रतिक्रिया, अंतिम संस्कार की जानकारी

Web Summary : दिग्गज गायिका आशा भोसले का 93 वर्ष की आयु में मुंबई में निधन हो गया। उनके बेटे ने घोषणा की कि लोअर परेल स्थित उनके आवास पर अंतिम दर्शन किए जा सकते हैं, जिसके बाद शिवाजी पार्क में शाम 4 बजे राजकीय सम्मान के साथ अंतिम संस्कार किया जाएगा। सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार ने भी विवरण की पुष्टि की।

Web Title : Asha Bhosle Passes Away: Son's Emotional Response and Funeral Details

Web Summary : Legendary singer Asha Bhosle passed away at 93 in Mumbai. Her son announced that final respects can be paid at her residence in Lower Parel tomorrow morning, followed by cremation at Shivaji Park at 4 PM with state honors. Cultural Minister Ashish Shelar also confirmed the details.