आदिनाथ- उर्मिलाची इवलीशी जिजा पहा करतेय जिममध्ये वर्कआऊट, Video पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:21 IST2019-01-28T19:20:29+5:302019-01-28T19:21:06+5:30
अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आदिनाथ- उर्मिलाची इवलीशी जिजा पहा करतेय जिममध्ये वर्कआऊट, Video पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा
अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचा नुकताच पहिला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे तिचे क्यूट फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यानंतर आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकं काय आहे, ह्या व्हिडिओत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल ना. उर्मिलाने जिजासोबतचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
उर्मिलाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत उर्मिलाने जिजाला पाठीवर बांधले असून ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसते आहे आणि जिजालादेखील वर्कआऊट करताना खूप मजा वाटते आहे. हा व्हिडिओ शेअर करून उर्मिलाने लिहिले की, जेव्हा पप्पा स्पासाठी गेले असून जिजाला मी पाठीवर बांधून जिममध्ये वर्कआऊट करते आहे. खूप मजा येत आहे. तिला घेऊन वर्कआऊट करताना तणावमुक्त आहे.
उर्मिलाचा जिजासोबतचा जिममधील व्हिडिओ पाहून खरेच उर्मिलाचे कौतूक वाटत आहे आणि सोशल मीडियावर देखील या व्हिडिओवर खूप कमेंट्स येत असून तिला मणिकर्णिका अशीही प्रतिक्रिया मिळते आहे.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते.