Video: आम्ही जिजाऊच्या लेकी! प्रवीण तरडेंच्या पत्नीने १५ हजार फुटांवरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 12:38 IST2023-03-09T12:37:15+5:302023-03-09T12:38:14+5:30

Snehal tarde: सध्या स्नेहल तिच्या मैत्रिणींसह ऑस्ट्रेलियाची सफर करत असून सिडनीमध्ये तिने स्काय डायव्हिंगचा अनुभव घेतला.

actress snehal tarde celebrate womens day with skydiving video viral | Video: आम्ही जिजाऊच्या लेकी! प्रवीण तरडेंच्या पत्नीने १५ हजार फुटांवरुन मारली उडी

Video: आम्ही जिजाऊच्या लेकी! प्रवीण तरडेंच्या पत्नीने १५ हजार फुटांवरुन मारली उडी

आजच्या काळात कोणतीही स्त्री पुरुषाच्या मागे नाही हे स्त्रियांनी वारंवार सिद्ध करुन दाखवलं आहे. कोणत्याही क्षेत्रात आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मग ते कॉर्पोरेट क्षेत्रातलं काम असो वा एखादं जोखमीचं काम असतो. सध्या सोशल मीडियावर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रवीण तरडे यांची पत्नी  स्नेहल तरडे हिची चर्चा रंगली आहे. स्नेहलने तब्बल १५ फूटांवरुन उडी मारली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या स्नेहल तिच्या मैत्रिणींसह ऑस्ट्रेलियाची सफर करत असून सिडनीमध्ये तिने स्काय डायव्हिंगचा अनुभव घेतला. तब्बल १५ हजार फुटांवरुन तिने उडी मारली आहे. इतकंच नाही तर, मी जिजाऊची लेक आहे १५ काय ३० हजार फुटांवरुनही उडी मारेन मी, असंही ती म्हणाली. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, ३० हजार फुटावरूनही उडी मारू शकतो... मी उडी मारणार... जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र!’ असं म्हणत स्नेहल स्काय डायव्हिंगसाठी सज्ज झाली आणि तब्बल १५ हजार फुटांवरून त्यांनी उडी मारली. 

दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी हटके करण्यासाठी स्नेहल तरडे व त्यांच्या मैत्रिणींनी सिडनीमध्ये स्काय डायव्हिंग केले आहे. स्नेहलसह तिच्या मैत्रिणी अनिता पाटील आणि रूपाली पवार देखील होत्या. स्नेहल मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मु. पोस्ट धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: actress snehal tarde celebrate womens day with skydiving video viral