Prajakta Mali: अशी केली होती प्राजक्ता माळीनं 'पावनखिंड'मधील श्रीमंत भवानीबाई बांदल भूमिकेची तयारी, सेटवरील BTS फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:48 IST2022-12-28T17:30:03+5:302022-12-28T19:48:05+5:30
पावनखिंडमध्ये सिनेमात प्राजक्ताने श्रीमत रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमाच्या सेटवरील प्राजक्ताचा अनसीन फोटो व्हायरल झाला आहे.

Prajakta Mali: अशी केली होती प्राजक्ता माळीनं 'पावनखिंड'मधील श्रीमंत भवानीबाई बांदल भूमिकेची तयारी, सेटवरील BTS फोटो व्हायरल
Prajakta Mali : तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. प्राजक्ताच्या पावनखिंडच्या सेटवरील एक अनसीन फोटो समोर आला आहे.
पावनखिंडमध्ये सिनेमात प्राजक्ताने श्रीमत रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट झाला होता. आता प्राजक्ताचा या सिनेमाच्या सेटवरचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्राजक्ताच्या एका हातात हातात स्क्रिप्ट आहे जी वाचताना ती दिसतेय तर दुसऱ्या हातात चहाचा कप आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'पावनखिंड'बद्दल बोलायचे झाले तर या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले होतं. अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली. चिन्मय मांडलेकर यांनी शिवरायांची भूमिका जिवंत केली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे.