Pooja Sawant : 'हिच्या घोवाला कोकण दाखवा..', अभिनेत्री पूजा सावंत पोहचली कोकणात; शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 12:14 IST2024-06-13T12:13:07+5:302024-06-13T12:14:48+5:30

पुन्हा एकदा पूजा सावंतचं कोकण प्रेम पाहायला मिळालं आहे.

actress Pooja Sawant Shared special photos of Konkan | Pooja Sawant : 'हिच्या घोवाला कोकण दाखवा..', अभिनेत्री पूजा सावंत पोहचली कोकणात; शेअर केले खास फोटो

Pooja Sawant : 'हिच्या घोवाला कोकण दाखवा..', अभिनेत्री पूजा सावंत पोहचली कोकणात; शेअर केले खास फोटो

आपल्या सुंदर अभिनयाने अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant ) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पूजा सावंतला महाराष्ट्राची 'कलरफुल' अभिनेत्री म्हणूनही ओळखलं जातं. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टना देखील तितकीच पसंती मिळते. त्यामुळे पूजाचा चाहतावर्गही मोठा आहे. नुकताच पुजाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये निर्सगमय कोकणाची झलक पाहायला मिळतेय. पूजा तिच्या कुटुंबासोबत कोकणात तिच्या गावी गेलीये. 


पुन्हा एकदा पूजा सावंतचं कोकण प्रेम पाहायला मिळालं आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने 'हिच्या घोवाला कोकण दाखवा' हे गाणं जोडलं आहे. तर 'कोकणातील सकाळ पावसाच्या आगमनापुर्वी आमच्या घरी नवीन ६ माडांचं आगमन झालं', असं कॅप्शन दिलं आहे. त्याचप्रमाणे पुजाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही कोकणातील काही खास फोटो शेअर केले आहेत. सध्या पूजाच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. तसेच तिचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस देखील पडत असल्याचं पाहायला मिळतंय. 

पूजा सावंतनं आजवर अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर पूजानं सिद्धेश चव्हाण याच्यासोबत अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न केलं आहे. पूजाने २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पूजाचा नवरा सिद्धेश हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे लग्नानंतर जवळपास १ ते दीड महिने पूजा ऑस्ट्रेलियात राहिली होती. सध्या पूजा एकटी मुंबईला परतली आहे.  आता अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतं.

Web Title: actress Pooja Sawant Shared special photos of Konkan