"माझं खूप मोठं दुःख आहे की..."; निवेदिता सराफ यांनी पहिल्यांदाच व्यक्त केली खंत, म्हणाल्या-
By देवेंद्र जाधव | Updated: October 8, 2025 13:22 IST2025-10-08T13:21:54+5:302025-10-08T13:22:58+5:30
निवेदिता सराफ यांनी मुलाखत देताना त्यांच्या मनातील दुःख सर्वांसोबत व्यक्त केलं आहे. काय म्हणाल्या निवेदिता?

"माझं खूप मोठं दुःख आहे की..."; निवेदिता सराफ यांनी पहिल्यांदाच व्यक्त केली खंत, म्हणाल्या-
निवेदिता सराफ या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. निवेदिता यांना आपण विविध सिनेमा, मालिका, नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. निवेदिता यांनी नुकतंच आई आणि बाबा रिटायर होत आहेत, या मालिकेतून अभिनय केला. नुकतंच निवेदिता यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मनातील आजवर कधीही व्यक्त न केलेली खंत बोलून दाखवली. काय म्हणाल्या निवेदिता?
निवेदिता यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''सर्वात जास्त मी बसलेय श्रीनिवास खळेंच्या स्टुडिओमध्ये. ते रेकॉर्डींग करायचे तेव्हा 'आपली आवड' नावाचा अप्रतिम कार्यक्रम रेडिओवर रात्री व्हायचा. ज्यातली गाणी श्रीनिवास खळेंनी स्वरबद्ध केलेली असायची. बऱ्याचदा मंगेश पाडगावकर किंवा पी. सावळाराम यांंचं काव्य असायचं. त्यांच्या काव्याला श्रीनिवास खळेंचं संगीत असायचं. त्यांचं निवेदन कमलिनी विजयकर करायचे. जितकं बिना का गीत आणि अमिन सयानीचा आवाज लोकप्रिय होता तितकं महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपली आवड आणि कमलिनी विजयकर यांचा आवाज फेमस होता. त्या काळात काही गाण्यांची मी साक्षीदार असेल.''
''बऱ्याच वेळेस आईबरोबर मी ऑफिसला जायचे तर मग ते कानांवर संस्कार होत गेले. साहित्याचे, वाचनाचे, गाण्यांचे संस्कार झाले. माझं खूप मोठं दुःख आहे की, मला सूर नाहीये. पण कान आहे. लहानपणापासून ऐकलेलं असल्याने.'', अशाप्रकारे निवेदिता यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली. निवेदिता नुकतंच 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमात पाहायला मिळाल्या. निवेदिता यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.