महफ़िल में तेरी हम न रहें जो...विकी कौशलचं लग्न होताच हेमांगी कवीची इमोशनल पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 05:05 PM2021-12-10T17:05:43+5:302021-12-10T17:11:35+5:30

विकी कौशल(vicky kaushal)च्या लग्नानंतर हेमांगी कवी (Hemangi kavi)ने लिहिले ही पोस्ट चर्चा विषय ठरली आहे.

Actress hemangi kavi write a note on social media after vicky kaushal wedding | महफ़िल में तेरी हम न रहें जो...विकी कौशलचं लग्न होताच हेमांगी कवीची इमोशनल पोस्ट व्हायरल

महफ़िल में तेरी हम न रहें जो...विकी कौशलचं लग्न होताच हेमांगी कवीची इमोशनल पोस्ट व्हायरल

googlenewsNext

हेमांगी कवी  (Hemangi kavi) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील रोखठोक अभिनेत्री. स्वत:चे विचार परखडपणे मांडणारी बेधडक अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. अनेकदा ती यावरून ट्रोलही होते. हेमांगीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या पोस्टमुळे हेमांगी चर्चेत आली. हेमांगीने विकी कौशल(vicky kaushal) सोबतचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले, महफ़िल में तेरी हम न रहें जो, (बुलाया ही नहीं, कहां से रहेंगे) गम तो नहीं है, गम तो नहीं है। अर्थात हेमांगीने हे सगळं गंमतीने लिहिले आहे. 

9 डिसेंबरला विकी कौशल (vicky kaushal) कतरिना कैफ (katrina kaif)सोबत विवाह बंधनात अडकला. लाखो तरुणाच्या गाळ्यातील ताईत असलेल्या विकीच्या लग्नामुळे अनेक मुलींचं ह्रदय तुटले असले. या शाही सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

 हेमांगी कवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने फक्त लढ म्हणा, डावपेच, कोण आहे रे तिकडे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ठष्ट, ती फुलराणी या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे.

Web Title: Actress hemangi kavi write a note on social media after vicky kaushal wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.