स्वतः उपाशी राहून मुलांना जेवण भरवताय? गिरीजा ओकने दिलेला 'हा' सल्ला प्रत्येक आईने जरुर वाचाच

By देवेंद्र जाधव | Updated: October 6, 2025 15:24 IST2025-10-06T15:23:29+5:302025-10-06T15:24:43+5:30

प्रत्येक आईसाठी मुलांना जेवण भरवणं हे एक कठीण काम असतं. त्यासाठी गिरीजा ओकने दिलेला सल्ला प्रत्येक आईसाठी नक्कीच फायदेशीर आहे

actress Girija Oak godbole gave a simple solution to mother who feeding her small child | स्वतः उपाशी राहून मुलांना जेवण भरवताय? गिरीजा ओकने दिलेला 'हा' सल्ला प्रत्येक आईने जरुर वाचाच

स्वतः उपाशी राहून मुलांना जेवण भरवताय? गिरीजा ओकने दिलेला 'हा' सल्ला प्रत्येक आईने जरुर वाचाच

गिरीजा ओक गोडबोले ही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. गिरीजा सध्या ओटीटीविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. गिरीजा प्रत्येक गोष्टींवर तिचं महत्वाचं मत व्यक्त करताना दिसते. अशातच गिरीजाने प्रत्येक आईने जरुर वाचावा, असा सल्ला दिला आहे. आई अनेकदा स्वतः न जेवता मुलांना जेवण भरवते. पण त्यामुळे पुढे किती त्रास होतो, याचा खुलासा गिरीजाने केला असून तिने सर्व आईंसाठी मोलाची गोष्ट सांगितली आहे.

गिरीजाने लहान मुलांच्या आईला दिला हा सल्ला 

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत गिरीजाने सांगितलं की, ''लहान मुलांना जेवण भरवणं हा एक कार्यक्रम असतो. चिऊताईचा घास असतो, कधी विमानातून उडून घास येतो. एकूणच लहान मुलांना जेवण भरवणं हा एक तासभर चालणारा कार्यक्रम असतो. जर तुम्ही स्वतः उपाशी आहात आणि तुम्हाला लहान मुलांना जेवण भरवायचं असेल तर पटकन राग येऊ शकतो. शेवटपर्यंत पारा चढलेला असतो. मी सुद्धा अशावेळी ४० मिनिटापर्यंत ठीक असायची पण नंतर मात्र 'खा रे, आता!!' असं होतं. कारण तो जेवल्यानंतरच मी जेवणार. तो बिचारा उपाशी आहे तर मी कसं खाणार, आई कशी जेवेल असा विचार यायचा.'' 

''एकदा माझी सासू आली तेव्हा तिने मला सांगितलं याची काही गरज नाही. आधी तू जेवून घे, मग त्याला जेवण भरव. लहान बाळाला तसंही खाण्यात इंटरेस्ट नाही. त्याला खेळायचं असतं. त्याला ४ मिनिटं उशीरा जेवण भरवलं तर काहीही फरक पडणार नाही. पण तुझी अवस्था बघ काय झालीये, त्यामुळे तू आधी जेवून घे, असं सासूबाई म्हणायच्या. त्यानंतर मी आधी जेवून घ्यायची. मी आणि सासूबाईंनी या गोष्टीला एक कोडवर्ड दिला. लहान मुलांची मदत करण्यासाठी आधी तुम्ही सक्षम व्हा त्यानंतर मुलांची मदत करा.'' 

Web Title : अभिनेत्री गिरिजा ओक की सलाह: माँ पहले खाएं, फिर बच्चों को खिलाएं।

Web Summary : अभिनेत्री गिरिजा ओक माताओं को सलाह देती हैं कि वे अपने बच्चों को खिलाने से पहले अपने भोजन को प्राथमिकता दें। उन्होंने जोर दिया कि एक भरी हुई माँ बच्चे को खिलाने में अधिक धैर्यवान और प्रभावी होती है, जो तुरंत खाने में दिलचस्पी नहीं ले सकता है। उनकी सास की सलाह ने उनका नज़रिया बदल दिया।

Web Title : Actress Girija Oak's advice: Mothers, eat first, then feed kids.

Web Summary : Actress Girija Oak advises mothers to prioritize their own meals before feeding their children. She emphasizes that a fed mother is more patient and effective in feeding a child who may not be immediately interested in eating. Her mother-in-law's advice changed her approach.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.