काय आहे सुबोध भावेचा ड्रीम रोल? म्हणाला- "गेली १५ वर्ष मी स्क्रीप्टवर काम करतोय अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:51 IST2025-01-02T10:50:51+5:302025-01-02T10:51:16+5:30

अभिनेता सुबोध भावेने एका मुलाखतीत त्याच्या ड्रीम रोलबद्दल सांगितलं. ज्यावर तो गेली १५ वर्ष काम करतोय

actor Subodh Bhave talk about his dream role on working yayati novel | काय आहे सुबोध भावेचा ड्रीम रोल? म्हणाला- "गेली १५ वर्ष मी स्क्रीप्टवर काम करतोय अन्..."

काय आहे सुबोध भावेचा ड्रीम रोल? म्हणाला- "गेली १५ वर्ष मी स्क्रीप्टवर काम करतोय अन्..."

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'बालगंधर्व', 'लोकमान्य', 'कट्यार काळजात घुसली', 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर' अशा विविध सिनेमांमधून सुबोधने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सुबोध भावेच्या आगामी 'संगीत मानापमान' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सुबोध भावेने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या ड्रीम रोलबद्दल सर्वांना सांगितलंय. 

सुबोध भावेने सांगितला त्याचा ड्रीम रोल

सुबोध भावेने अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला की, "बायोपिक अजिबातच नाहीये. पण एक भूमिका आहे ज्याच्या संहितेवर मी गेली १५ वर्ष काम करतोय. मला असं दिसतंय की आता ते दृष्टीक्षेपात आलंय. कदाचित पुढच्या एक-दोन महिन्यात त्याचं लिखाण संपेल. बालगंधर्व झाल्यानंतर मी त्याची संहिता करायला घेतली. खूप अवघड आहे. ती व्यक्तिरेखा करणं अवघड आहे आणि तो चित्रपट करणंही अवघड आहे. पण तरीही मला तो करायचाय आणि ते मी करणार. ते म्हणजे ययाती. ती भूमिका मला करायचीय. आता कुठे त्याला आकार मिळालाय. आणि आता वाटतंय की यावर चित्रपट होऊ शकेल. त्यामुळे हे एक स्वप्न आहे माझं जे मला पूर्ण करायचंय."

मराठी साहित्यविश्वात 'ययाती' कादंबरीला एक मानाचं स्थान आहे. वि.स.खांडेकर यांनी ही कादंबरी लिहिली असून या कादंबरीला १९७४ साली साहित्यविश्वातील सर्वोच्च मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 


सुबोधच्या संगीत मानापमानची उत्सुकता

सुबोध भावे आगामी 'संगीत मानापमान' सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात सुबोधसोबत अभिनेता सुमीत राघवन,  वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहे. या सिनेमात अमृता खानविलकरचीही विशेष भूमिका आहे. 'संगीत मानापमान' सिनेमा १० जानेवारीला रिलीज होणार आहे. 'कट्यार काळजात घुसली' सिनेमानंतर सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा आहे.

 

Web Title: actor Subodh Bhave talk about his dream role on working yayati novel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.