अवघ्या ६व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार! कमल हासन यांच्याकडून मराठमोळ्या त्रिशा ठोसरचं कौतुक! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:54 IST2025-09-26T14:16:19+5:302025-09-26T14:54:41+5:30
अवघ्या ६व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार! कमल हासन यांच्याकडून मराठमोळ्या त्रिशा ठोसरला कौतुकाची थाप, म्हणाले...

अवघ्या ६व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार! कमल हासन यांच्याकडून मराठमोळ्या त्रिशा ठोसरचं कौतुक! म्हणाले...
Kamal Haasan Post : मनोरंजन विश्वात महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला आहे. कलाकार आणि तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरम्यान,भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यानंतर सध्या सर्वत्र नाळ-२ फेम बालकलाकार त्रिशा ठोसर प्रचंड चर्चेत आली आहे. अवघ्या ६ वर्षांची त्रिशा साडी नेसून या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. त्यानंतर तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर सर्वच क्षेत्रातून या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
Dear Ms. Treesha Thoshar, my loudest applause goes to you. You’ve beaten my record, as I was already six when I got my first award! Way to go madam. Keep working on your incredible talent. My appreciation to your elders in the house.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) September 25, 2025
याचदरम्यान, प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी बालकलाकार त्रिशाचं कौतुक करणारी खास पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. याचं कौतुक करत कमल हसन यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय,"प्रिय त्रिशा ठोसर, तुझं खूप खूप अभिनंदन.तुला माहितीये , तू माझा रेकॉर्ड मोडला आहेस, कारण जेव्हा मला माझा पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा सुद्धा सहा वर्षांचा होतो.खूपच छान! यापुढेही असंच काम करत राहा. तुझ्या घरातील वडीलधाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन."अशा आशयाची पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यंदाच्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेविश्वातील बालकलाकारांनी बाजी मारली. 'नाळ-२' मधील त्रिशाला हा पुरस्कार मिळाला आहे. अवघ्या सहाव्या वर्षी इतका मोठा सन्मान मिळणं हे पाहून अनेकजण भारावले आहेत.