Abhinay Berde: "मावा खातोस का?'; अनपेक्षित प्रश्नालाही अभिनय बेर्डेचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 18:50 IST2022-10-08T18:38:54+5:302022-10-08T18:50:14+5:30
अभिनयला एका ट्रोलिंगचा समाना करावा लागला आहे. अभिनयने ट्रोल करणाऱ्या चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Abhinay Berde: "मावा खातोस का?'; अनपेक्षित प्रश्नालाही अभिनय बेर्डेचं सडेतोड उत्तर
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लक्ष्मीकांत यांचाा मुलगा अभिनय याने काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ती सध्या काय करते हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाद्वारे तो घराघरात पोहोचला. आता लवकरच तो 'मन कस्तुरी रे' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं सध्या तो जोरदार प्रमोशन सुरु आहे. यात त्याच्यासोबत बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ दोघेही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनयला एका ट्रोलिंगचा समाना करावा लागला आहे. अभिनयने ट्रोल करणाऱ्या चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मन कस्तुरी रे चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पिल्लई एज्युकेशन कॅम्पस येथे पार पडला. या लाँच सोहळ्यादरम्यान अभिनय बेर्डे आणि तेजस्विनी प्रकाश यांनी ढोल ताशावर ठेका धरला. या दोघांनी ढोल पथकाच्या तालावर ताल धरत तुफान नृत्यदेखील केलं.
या दोघांचे कार्यक्रमादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावरुन एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अभियनचा हा व्हिडीओ पाहून ‘तू मावा खातोस का?’ असा सवाल नेटकऱ्याने अभिनयला विचारला. त्यावर अभिनय बेर्डेच्या टीमने ‘तोंड सांभाळून बोला’ असा रिप्लाय दिला आहे. तर अभिनयने चोख उत्तर दिलं आहे. अभिनयनं लिहिलं, ‘मी मावा खात नाही पण मवाली आहे मी’ अशा शब्दात ट्रोर्लची बोलतीच बंद केली आहे.