Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 08:43 AM2024-02-04T08:43:53+5:302024-02-04T08:44:49+5:30

Abhinay berde: या युजरने अभिनयला अत्यंत वाईट शब्दांत ट्रोल केलं आहे.

abhinay-berde-abused-by-a-stranger-on-instagram-he-uses-bad-words-for-actor | Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...'

Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...'

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि प्रसिद्ध स्टारकिड अभिनय बेर्डे (abhinay berde) सध्या चर्चेत आला आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनयला एका ट्रोलरने अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे. या अनोळखी युजरने त्याला मेसेज करत ट्रोल केलं आहे.  अभिनयने सोशल मीडियावर या युजरची कमेंट करत त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

कलाविश्वात नशीब आजमावणाऱ्या अभिनयला आतापर्यंत अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु, अभिनय सुद्धा या ट्रोलर्सला चांगलंच सुनावत असतो. परंतु, यावेळी अभिनयने स्क्रीन शॉट शेअर करत या युजरला सुनावलं आहे.

काय म्हणाला अभिनय?
 

अभिनयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोल करणाऱ्या युजरच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात या ट्रोलरने त्याला अपशब्द वापरल्याचं दिसून येत आहे. या अकाऊंटच्या डिपीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. मात्र, त्याचं वर्तन या फोटोला शोभणारं मुळीत नाही, असं म्हणत त्याने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, अभिनय स्टारकिड असून सुद्धा त्याला कलाविश्वात बराच स्ट्रगल करावा लागला आहे. आई आणि वडील दोघंही मराठी कलाविश्वातील नामवंत, दिग्गज कलाकार असूनही अभिनयच्या वाट्याचा संघर्ष काही चुकला नाही. एका दिग्दर्शकाने सुद्धा त्याला शिवीगाळ केली होती, याविषयीचा खुलासा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी स्वत: केला होता. परंतु, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर अभिनयने स्वत:ला सिद्ध केलं.  अभिनयने ‘बांबू’, ‘मन कस्तूरी रे’, 'बॉईज ४' ,'ती सध्या काय करते' यांसारख्या गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे.

Web Title: abhinay-berde-abused-by-a-stranger-on-instagram-he-uses-bad-words-for-actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.