वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 15:02 IST2024-10-27T15:01:50+5:302024-10-27T15:02:18+5:30

लहानपणीचा गोड फोटो आणि सुंदर आठवण

Abhinay Beirde shared an emotional post on Laxmikant berde s birth anniversary | वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

मराठीतील विनोदाचा बादशाह अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची आजही सगळेच आठवण काढतात. अगदी कमी वयात लक्ष्याने जगाचा निरोप घेतला होता. याचा मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेही (Abhinay Berde) आता सिनेसृष्टीत कार्यरत आहे. सध्या तो 'आजीबाई जोरात' नाटकात काम करतोय. काल लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने भावुक पोस्ट शेअर केली होती.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं तेव्हा अभिनय अगदीच लहान होता. बाबांसोबत लहानपणीचा फोटो शेअर करत अभिनयने लिहिले, "हॅपी बर्थडे आबा. तुझ्या कामाचा आणि प्रसिद्धीचा २० वर्षांचा वारसा आजही तसाच आहे. तुमच्या चाहत्यांनी तुमची आठवण अजून जिवंत ठेवलीये. miss you."

अभिनयने वडिलांसोबतचा खूप गोड फोटो शेअर केला आहे. यात त्याचा चेहरा रडवेला झाल्यासारखा दिसतोय. अभिनय अनेक मुलाखतींमधून वडिलांविषयी व्यक्त झाला आहे. त्याच्या 'आजीबाई जोरात' नाटकाच्या अनाऊन्समेंटला AI चा वापर करुन लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज रिक्रिएट करण्यात आला आहे. सर्वच चाहत्यांसाठी हा खूप भावुक क्षण आहे. 

अभिनय बेर्डेने 'ती सध्या काय करते' या मराठी सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर त्याने 'अशी ही आशिकी','मन कस्तुरी रे','रंपट','बांबू','बॉइज ४' या सिनेमांमध्येही भूमिका साकारली.

Web Title: Abhinay Beirde shared an emotional post on Laxmikant berde s birth anniversary