आली रे आली अप्सरा आली! इंस्टाग्राम रीलवर अवतरली सोनाली कुलकर्णी, पहा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 19:21 IST2020-08-25T19:21:13+5:302020-08-25T19:21:38+5:30
सोनाली कुलकर्णीने आता इंस्टाग्राम रीलवर धमाकेदार एन्ट्री केली आहे.

आली रे आली अप्सरा आली! इंस्टाग्राम रीलवर अवतरली सोनाली कुलकर्णी, पहा हा व्हिडिओ
मराठी चित्रपटसृष्टीतीस अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. सोनाली कुलकर्णीने आता इंस्टाग्राम रीलवर धमाकेदार एन्ट्री केली आहे.
नटरंग या चित्रपटातील म्युझिकवर व्हिडिओ करून सोनालीने रील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत सोनालीने लिहिले की, "इन्स्टाग्राम रीलच्या जगात एन्ट्री करताना."
नटरंग या चित्रपटाने सोनालीला एक वेगळी ओळख दिली आहे. याच सिनेमातील 'अप्सरा आली' या गाण्यातून सोनाली घराघरात लोकप्रिय झाली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप भावला आहे.
तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.