जब्या आणि शालूच्या लग्नानंतरच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आला समोर, नेटकरी म्हणताहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:07 IST2024-12-26T16:01:44+5:302024-12-26T16:07:34+5:30

काही दिवसांपूर्वी 'फॅंड्री' सिनेमात (Fandry Movie) झळकलेले जब्या आणि शालू म्हणजेच सोमनाथ अवघाडे (Somnath Awaghade) आणि राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) यांच्या लग्नाचा फोटो समोर आला होता. त्यानंतर आता सोमनाथने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते लग्नानंतरचे विधी करताना दिसत आहे

A video of Jabya Aka Somnath Awaghade and Shalu Aka Rajeshwari Kharat's post-wedding event surfaced, netizens are saying... | जब्या आणि शालूच्या लग्नानंतरच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आला समोर, नेटकरी म्हणताहेत...

जब्या आणि शालूच्या लग्नानंतरच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आला समोर, नेटकरी म्हणताहेत...

काही दिवसांपूर्वी 'फॅंड्री' सिनेमात (Fandry Movie) झळकलेले जब्या आणि शालू म्हणजेच सोमनाथ अवघाडे (Somnath Awaghade) आणि राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) यांच्या लग्नाचा फोटो समोर आला होता. त्यानंतर आता सोमनाथने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते लग्नानंतरचे विधी करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

सोमनाथ अवघाडे आणि राजेश्वरी खरातचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्यात सोमनाथ आणि राजेश्वरी दोघे वर आणि वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. डोक्याला मुंडावळ्या, सोमनाथने गोल्डन रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर राजेश्वरीने मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे. या फोटोत ते पोझ देताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून त्या दोघांनी लग्न केले असल्याचे बोलले जात होते. त्या नंतर आता त्यांच्या लग्नानंतरच्या विधींचा व्हिडीओ समोर आला आहे. खरेतर हा व्हिडीओ सोमनाथने शेअर केला आहे.


सोमनाथ अवघाडे आणि राजेश्वरी खरात यांच्या अफेयर्सच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. त्यात त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्या दोघांनी लग्न केल्याचे बोलले जात होते. मात्र खऱ्या आयुष्यात त्यांनी लग्न केलेले नसून त्यांच्या लग्नाचा फोटो आणि लग्नानंतरच्या विधींचा व्हिडीओ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. सोमनाथने तो व्हिडीओ शेअर करत शूटिंगचे सिम्बॉल वापरले आहेत. अद्याप या चित्रपटाबद्दलचे कोणतेच अपडेट समोर आलेले नाहीत. 

'फँड्री' सिनेमाबद्दल
२०१३ साली नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅंड्री चित्रपट सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आणि त्यातील गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या सिनेमातील जब्या आणि शालूची लव्ह केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. आजही दोघे प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. 

Web Title: A video of Jabya Aka Somnath Awaghade and Shalu Aka Rajeshwari Kharat's post-wedding event surfaced, netizens are saying...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.