अस्से सासर सुरेख बाई! क्रांतीचं सासरच्या मंडळींवर खास प्रेम; शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 16:06 IST2023-11-19T16:03:53+5:302023-11-19T16:06:32+5:30
एक खास व्हिडीओ क्रांती रेडकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अस्से सासर सुरेख बाई! क्रांतीचं सासरच्या मंडळींवर खास प्रेम; शेअर केला व्हिडीओ
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या सोशल मीडियावरील रील्स व्हिडिओमुळं चर्चेत असते. तिचे मजेशीर व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. तिचे सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणी या व्हिडीओंवर कमेंट्स करताना दिसतात. असाच एक खास व्हिडीओ क्रांतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सासरच्या मंडळींच कौतुक करताना पाहायला मिळत आहे.
क्रांती रेडकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “मी इथे वाशिमला माझ्या सासरी आलेली आहे. मिस्टर वानखेडे जेवण करत आहेत. ही माझ्या सासरची मंडळी. मोठी आत्या, छोटी आत्या, माझी काकी. माझं इंटरमिटंट फास्टिंग चालू होतं, पण आता इंटर मटण फास्टिंग झालं आहे. रोज माझ्या सासरी मटण भाकरीचा बेत सुरु आहे. इतकं अप्रतिम आणि चविष्ट जेवण रोज मी जेवते आहे. माझ्या सासरी माझे खूप लाड झाले, पण आता मुंबईत जाऊन परत कामावर रुजू व्हायचं. त्यामुळे मी या सर्वांना खूप मिस करणार आहे'.
या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये क्रांतीने लिहले की, 'यावर्षीची दिवाळी आमच्यासाठी विशेष होती. कारण यंदा आमच्या नातेवाइकांसह आम्हाला दिवाळी साजरी केली. मला त्यांची खूप आठवण येणार आहे. त्यांचे अंतःकरण आमच्यासाठी प्रेमाने भरलेले आहे. वाशिमच्या जनतेने जे प्रेम आणि जिव्हाळा दाखवला, त्याच्यासाठी तुमचे आभार'.
क्रांती सहकुटुंब तिची दिवाळी साजरी करण्यासाठी पती समीर वानखेडे यांच्या वाशिम येथील मूळगावी पोहोचली होती. यावेळी तिने समीर यांच्या नातेवाईकांसह मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. क्रांतीने २०१८ मध्ये जु्ळ्या मुलींना जन्म दिला. दोघींची घरी काय मस्ती सुरु असते हे क्रांती अनेकदा व्हिडिओतून सांगत असते. क्रांतीने मुलींचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. त्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून तिने नेहमीच खबरदारी घेतली.