'ती मला घराबाहेर काढेल'; तेजस्विनी पंडितला 'या' कारणामुळे वाटते आईची भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:49 IST2022-01-21T13:46:11+5:302022-01-21T13:49:51+5:30
Tejaswini pandit: ध्या तेजस्विनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. यात तिने जर आयुष्यात तिला आवडत असलेली ही एक गोष्ट केली तर तिची आई तिला घरातून बाहेर काढेल असं तिने म्हटलं आहे.

'ती मला घराबाहेर काढेल'; तेजस्विनी पंडितला 'या' कारणामुळे वाटते आईची भीती?
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित(tejaswini pandit). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या तेजस्विनीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे तेजस्विनी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायमच चर्चा रंगत असते. परंतु, सध्या तेजस्विनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. यात तिने जर आयुष्यात तिला आवडत असलेली ही एक गोष्ट केली तर तिची आई तिला घरातून बाहेर काढेल असं तिने म्हटलं आहे.
अलिकडेच तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्येच तू नाकात नोज रिंग घातल्यावर खूप छान दिसतेस असं एका चाहत्याने तिला सांगितलं. त्यावर माझी इच्छा आहे पण तसं करु शकत नाही, असं उत्तर तेजस्विनीने दिलं.
"विश्वास ठेवा. मला नाक टोचायचं आहे. पण, आई मला घराबाहेर काढेल जर मी तसं केलं तर", असं उत्तर देत तिने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या. विशेष म्हणजे तेजस्विनीला खरोखरच आईची भीती वाटत नाही. तर मजेमध्ये तिने असं उत्तर चाहत्याला दिलं आहे.
दरम्यान, तेजस्विनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज तेजस्विनी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मी सिंधुताई, अग्गंबाई अरेच्चा, तु ही रे, येरे येरे पैसा, देवा अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.