"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:14 IST2025-06-12T12:13:56+5:302025-06-12T12:14:44+5:30

"आपल्या समाजात लिव्ह इनचा टॅबू आहे. पण..."

marathi actress suparna shyam talks about advantages of live in relationship | "लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."

"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."

'लग्नाची बेडी' मालिकेतून लोकप्रिय झालेली ऑनस्क्रीन जोडी संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम(Suparna Shyam). २०२३ साली या दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. दोघंही मालिकेच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले. इथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. लग्नाआधी दोघंही लिव्ह इनमध्ये राहत होते. नुकतंच सुपर्णाने लिव्ह इन मध्ये राहण्याचा काय फायदा होतो यावर भाष्य केलं.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सुपर्णा म्हणाली, "लिव्ह इनचा टॅबू आपल्या समाजात आहे. पण खरंतर याचा खूप फायदा होतो. अर्थाच आमच्यासोबत फॅमिलीही होती. त्यामुळे मला तर उलट त्यांना जास्त समजून घेता आलं. त्यांनाही माझ्याबद्दल कळलं. मी कशी आहे, माझ्या सवयी काय आहेत हे समजलं. सगळंच कळलं. जरी दोघंच राहत असले तरी खूप फायदा आहे. कारण लग्नाआधी आपण बाहेर भेटतो तेव्हा सगळं चांगलं चांगलंच बोलतो. आपण आपले खरे रंग दाखवत नाही. एकत्र राहिल्यामुळे व्यक्ती खरंच कशी आहे कळतं. आपलं एकमेकांशी पटतंय का हे कळतं. त्यामुळे लिव्ह इन मध्ये राहणं वाईट अजिबातच नाही. तुम्हाला कोणत्या मर्यादा ठेवायच्या त्या तुम्ही ठरवू शकता. पण मी नक्कीच इतरांना लिव्ह इनमध्ये राहणं सुचवेन."


ती पुढे म्हणाली, "पुढचं अख्खं आयुष्य खराब करुन घेण्यापेक्षा आधीच एक महिना दिला ते केव्हाही चांगलं. लग्नानंतर घटस्फोट होण्यापेक्षा आधीच पार्टनरसोबत तुमची कंपॅटिबिलिटी बघून घ्या. नंतर ते सगळं आयुष्यभरासाठी खराब होतं. मी अशा मुली बघितल्या आहेत ज्यांचा घटस्फोट झाल्याने त्यांना परत लग्न करायची इच्छा नाही. त्यांचा विश्वासच उडाला आहे. तर असा एक छोटा प्रयोग आधीच करुन बघा."

Web Title: marathi actress suparna shyam talks about advantages of live in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.