'हे मन खुळावते!' अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:13 IST2026-02-07T16:10:52+5:302026-02-07T16:13:51+5:30
अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस

'हे मन खुळावते!' अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल
Shivani Naik Video: 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक. या मालिकेने तिला एक वेगळी आपण खास ओळख मिळवून दिली. आज घराघरामध्ये शिवानीचे असंख्य चाहते आहेत. मात्र, या मालिकेनंतर शिवानी फारशी कोणत्या मालिकेत दिसली नाही. त्यामुळे ती सध्या काय करते हा प्रश्न अनेकांना पडतो.
शिवानी कलाविश्वात सध्या सक्रीय नसली तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. अलिकडेच शिवानीने एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
शिवानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या रंगाची सुरेख साडी नेसली असून तिचा हा सिंपल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 'हे मन खुळावते' असं सुरेख गाणं तिच्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सुरु असल्यामुळे हा व्हिडीओ आणखीनच खास होत आहे.
दरम्यान, शिवानीने अभिनेता अमित रेखी याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. अमित सुद्धा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘भाग्य दिले तू मला’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.