बुरखा घातलेल्या 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलंत का? फोटो पाहून बायकोही घाबरली; म्हणाली, 'शप्पथ...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:34 IST2023-03-09T16:33:35+5:302023-03-09T16:34:33+5:30

अभिनेत्याचे डोळे पाहून नेटकरी तर घायाळ झालेत.

marathi actor shares photo wearing burqa wife scared after seeing photo comments | बुरखा घातलेल्या 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलंत का? फोटो पाहून बायकोही घाबरली; म्हणाली, 'शप्पथ...'

बुरखा घातलेल्या 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलंत का? फोटो पाहून बायकोही घाबरली; म्हणाली, 'शप्पथ...'

कलाकारांना अभिनयासाठी काय काय करावं लागेल याचा नेम नाही. आता हेच बघा एका मराठी अभिनेत्याने चक्क बुरखा परिधान केलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने एकूण तीन फोटो पोस्ट केले असून पहिला फोटो पाहून हा अभिनेता नेमका कोण हे ओळखणं खरंच कठीण आहे.

तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका 'श्री' म्हणजेच शशांक केतकर (Shashank ketkar) आहे. होय शशांकने बुरखा आणि हिजाब परिधान केलेले ३ फोटो पोस्ट केले आहेत. तर डोळ्यांखाली काजळ आणि सुरमाही आहे. त्याच्या डोळ्यांवर चाहते तर फिदा झालेत. त्याने या फोटोंना 'काळी राणी' असं कॅप्शन दिलं आहे.

शशांकने हे फोटो महिला दिनी पोस्ट केले. 'तुझे डोळे किती सुंदर आहेत, तू कोणत्याही लुक मध्ये क्युटच दिसतो' अशा कमेंट्स त्याला आल्या आहेत. पण या सगळ्यात एका कमेंटने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. शशांकची बायको प्रियंका फोटो पाहून घाबरली. कमेंट करत म्हणाली, 'पहिला फोटो : शप्पथ मला वाटलं महिला दिनी हा कोणत्या बाईचा फोटो टाकलास! घाबरले ना!'

आता शशांकची बायकोच घाबरली म्हणल्यावर चाहत्यांचं तर काय झालं असेल हे कमेंटमधून कळते. मात्र शशांकने असा फोटो का टाकला असावा तर त्याचं काय कारण म्हणजे त्याची मालिका 'मुरांबा'.

शशांक सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा'या मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे तर शिवानी मुंढेकर ही त्याच्या बायकोची म्हणजेच रमाची भूमिका साकारत आहे. मालिकेतील एका एपिसोडमध्ये घरातील सर्व पुरुष हे क्रिकेट मॅच बघायला गेले असतात तर सर्व महिला साड्यांची खरेदी करणार असतात. रमाला मात्र अक्षयच्याच पसंतीची साडी घेण्याची इच्छा असते. मग काय बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी अक्षय बुरखा घालून येतो आणि साडी विक्रेत्याची बायको असल्याचे नाटक करतो. तेव्हा तो रमाला साडीही पसंत करुन देतो.  तर मालिकेतील या एपिसोडसाठी शशांकने बुरखा घातला होता. तेच फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले ज्यावर अनेक कमेंट्स आल्या.

Web Title: marathi actor shares photo wearing burqa wife scared after seeing photo comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.