मराठी सिनेमांबद्दल माधुरी दीक्षितनं व्यक्त केली खंत; थेट मोठी मागणी करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:43 IST2025-12-22T16:42:27+5:302025-12-22T16:43:15+5:30
मराठी सिनेमांबद्दल माधुरी दीक्षितनं व्यक्त केली खंत, थिएटर मालक आणि पॉपकॉर्नबद्दल म्हणाली...

मराठी सिनेमांबद्दल माधुरी दीक्षितनं व्यक्त केली खंत; थेट मोठी मागणी करत म्हणाली...
Madhuri Dixit : मराठी चित्रपट दर्जेदार असूनही त्यांना आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार मराठी निर्मात्यांची असते. याबद्दल सतत वाद पाहायला मिळतात. यावर कलाकारांकडूनही आवाज उठवला जातो. अशातच आता बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित हिने मराठी चित्रपटांना भेडसावणाऱ्या या सर्वात मोठ्या समस्येवर बोट ठेवले आहे. मोठ्या हिंदी चित्रपटांमुळे चालणारे मराठी चित्रपटांच्या स्क्रीन काढल्या जातात, अशी खंत तिनं व्यक्त केली आहे.
'नवभारत टाईम्स'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत माधुरीने मराठी चित्रपटाची निर्माती म्हणून तिला आलेले अनुभव मांडले. ती म्हणाली, "मराठी चित्रपटांना थिएटर मिळवणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. व्हा एखादा मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा तो संपूर्णपणे थिएटरवर वर्चस्व गाजवतो. थिएटर मालकांच्या दृष्टीने पॉपकॉर्न, खाद्यपदार्थांची विक्री आणि इतर व्यावसायिक बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं".
माधुरीने पुढे एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. तिने सांगितले की, "छोट्या चित्रपटांची प्रेक्षकसंख्या वेगळी असते. त्यामुळे थिएटर मालकांना मोठे-मोठे चित्रपटच रिलीज व्हावेत असं वाटतं. आणि जर ती मोठी फिल्म चालली, तर जी मराठी फिल्म रिलीज झाली आहे आणि चांगली चालत असली तरी तिचे शो कमी केले जातात".
या समस्येतून बाहेर पडण्यासाठी माधुरीने दोन महत्त्वाचे उपाय सुचवले. ती म्हणाली, म्हणूनच, आपल्याला अधिक थिएटर्सची गरज आहे किंवा या दिशेने काहीतरी ठोस संघटना/व्यवस्था उभी राहण्याची आवश्यकता आहे".
माधुरीचं मराठी सिनेसृष्टीतील काम
दरम्यान, माधुरी दीक्षितने केवळ अभिनयातच नाही, तर निर्मितीतही मराठी सिनेसृष्टीला योगदान दिले आहे. तिने 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले, ज्यात तिच्यासोबत सुमीत राघवन आणि रेणुका शहाणे होते. तर, '१५ ऑगस्ट' आणि 'पंचक' या चित्रपटांची निर्मिती माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी केली होती. दरम्यान, माधुरीची 'मिसेस देशपांडे' ही नवी कोरी हिंदी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तुम्हाला ही सीरिज जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.