'मॅडम सर' मालिकेतील एस.आय. करिष्मा सिंगची बुलेट स्वारी, युक्ता म्हणाली- सुरूवातीला....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 05:01 PM2022-10-10T17:01:46+5:302022-10-10T17:12:12+5:30

मॅडम सर हि मालिका आणि त्यातील कलाकारांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील युक्ती कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे.

Madam Sir Karisma Singh's Bullet Ride, Yukta said- In the beginning.... | 'मॅडम सर' मालिकेतील एस.आय. करिष्मा सिंगची बुलेट स्वारी, युक्ता म्हणाली- सुरूवातीला....

'मॅडम सर' मालिकेतील एस.आय. करिष्मा सिंगची बुलेट स्वारी, युक्ता म्हणाली- सुरूवातीला....

googlenewsNext

सोनी सब वरील मॅडम सर हि मालिका आणि त्यातील कलाकारांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील युक्ती कपूरचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या अभिनयाची वाहवा नेहमीच होत असते. युक्तीचा मालिकेतील डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना खूपच भावतो आणि त्यात भर म्हणजे युक्ती मालिकेत चालवत असलेली बुलेट. युक्ती मॅडम सर मध्ये एस.आय. करिष्मा सिंगची भूमिका साकारते आणि या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. इतकंच नव्हे तर ती मालिकेत बुलेट चालवताना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळते. तिचा हा दबंग अंदाज प्रेक्षकांना आवडतोय.
 
या अनुभवाबात सांगताना युक्‍ती म्‍हणाली, ‘’मला टू-व्‍हीलर चालवायला येते आणि मला आठवते की, मी ६वी की ७वी मध्‍ये शिकत असताना माझ्या भावाने मला टू-व्‍हीलर चालवायला शिकवले होते. स्‍कूटरमध्‍ये गिअर्स नसले तरी मला टू-व्‍हीलर बॅलन्‍स कशी करावी हे माहित आहे. पण या मालिकेमध्‍ये मला बुलेट चालवायची होती, जी अत्‍यंत हेवी आहे. बुलेट इतर कोणत्‍याही प्रमाणित बाइकपेक्षा हेवी आहे आणि वळण घेताना दमछाक होते.

वेळ व सरावासह मी आता बुलेट देखील आरामशीरपणे चालवू शकते. सुरूवातीला खूप आव्‍हानात्‍मक वाटले, पण प्रेक्षकांनी माझ्या बाइक चालवण्‍याच्‍या शैलीला दिलेला अभिप्राय मला खूप आवडला. ते करिष्‍मा सिंगची धाडसी व कोमल बाजू पाहण्‍याचा आनंद घेत आहेत; यामुळे सर्व प्रयत्‍नांचे फळ मिळाल्‍यासारखे वाटते.’’ 

Web Title: Madam Sir Karisma Singh's Bullet Ride, Yukta said- In the beginning....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.