सबसे कातील राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात, गौतमी पाटीलला राधाचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:47 IST2026-01-11T22:47:14+5:302026-01-11T22:47:53+5:30

महाराष्ट्राची लाडकी लावणी नृत्यांगना राधा पाटीलने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात शानदार एन्ट्री घातली आहे

lavani dancer Radha Patil enter in bigg boss marathi 5 house challenge gautami patil | सबसे कातील राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात, गौतमी पाटीलला राधाचं खुलं आव्हान

सबसे कातील राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात, गौतमी पाटीलला राधाचं खुलं आव्हान

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये महाराष्ट्राची सर्वांची आवडती लावणीसम्राज्ञी राधा पाटीलने एन्ट्री केली आहे. राधाने खास डान्स करत 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात सर्वांचं लक्ष वेधलं 

'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेली राधा पाटील ही महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी आहे. राधाने महाराष्ट्रभरात तिच्या लावणीचे जाहीर कार्यक्रम केले आहेत. राधाची लावणी पाहायला महाराष्ट्रभरातून लोक गर्दी करतात. राधाने 'बिग बॉस मराठी ६'च्या मंचावर येताच गौतमी पाटीलला खुलं आव्हान केलं. त्यामुळे घरात आल्या आल्याच राधाचं विधान चर्चेचा विषय ठरलं.




रितेशने राधाचं खास अंदाजात स्वागत करुन तिला घरातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राधाने घरात एन्ट्री करताच सर्वांना नमस्कार करुन अभिवादन केलं. राधा पाटीलने घरात एन्ट्री केल्याने आता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात कशी रंगत निर्माण होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. राधाचे चाहते तिला नक्कीच सपोर्ट करतील यात शंका नाही. 

Web Title : राधा पाटिल ने बिग बॉस मराठी 6 में एंट्री, गौतमी पाटिल को चुनौती।

Web Summary : लावणी क्वीन राधा पाटिल ने बिग बॉस मराठी 6 में प्रवेश किया, अपने नृत्य से दर्शकों को मोहित किया। उन्होंने गौतमी पाटिल को खुली चुनौती दी, जिससे घर में तत्काल चर्चा शुरू हो गई। उनका प्रवेश शो में एक नया आयाम जोड़ने का वादा करता है।

Web Title : Radha Patil enters Bigg Boss Marathi 6, challenges Gautami Patil.

Web Summary : Lavani queen Radha Patil entered Bigg Boss Marathi 6, captivating viewers with her dance. She openly challenged Gautami Patil, sparking immediate buzz within the house. Her entry promises to add a new dimension to the show.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.