Amruta Fadnavis' new song: लफ्ज नए है...! अमृता फडणवीसांचे नवे गाणे येतेय; कोणते? दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:36 IST2022-07-15T17:36:00+5:302022-07-15T17:36:34+5:30
Amruta Fadnavis' new song: अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना नेहमीच प्रसिद्धी मिळत आलेली आहे. अनेकांनी त्यांच्या गाण्याची स्तुती तर अनेकांनी ट्रोलही केलेले आहे.

Amruta Fadnavis' new song: लफ्ज नए है...! अमृता फडणवीसांचे नवे गाणे येतेय; कोणते? दिली हिंट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचे नवे गाणे लवकरच येत आहे. याबाबत खुद्द अमृता यांनीच ट्विट करून माहिती दिली आहे.
अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना नेहमीच प्रसिद्धी मिळत आलेली आहे. अनेकांनी त्यांच्या गाण्याची स्तुती तर अनेकांनी ट्रोलही केलेले आहे. अमृता यांचे हे नवे गाणे जुन्या गाण्याचेच रिक्रिएट करण्यात आलेले आहे. ''लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना…. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना …… !'' असे म्हणत कोणते गाणे असेल याची हिंट दिलेली आहे.
सारेगमासोबत त्यांनी हे गाणे गायले आहे. 'वो तेरे प्यार का गम', असे हे गाणे असणार आहे. हे गाणे कधी रिलीज होईल याबाबत त्यांनी दिवस जाहीर केलेला नाही. तरी लवकरच येत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना….
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 15, 2022
लफ़्ज़ नए है ,
पर रंग वही सुहाना …… !
Thank you @saregamaglobal
Coming up ….#goldenmelody#recreation#Mukeshpic.twitter.com/fH8fhuDVY1
महाशिवरात्रीच्या दिवशी अमृता फडणवीस यांनी एक गाणे लाँच केले होते. त्या गाण्यानंतर पुढील त्यांचे काय प्लॅन्स आहेत, याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती. त्या म्हणाल्या की पुढील काही महिन्यांतच माझी नवी गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. "मी रेकॉर्ड केलेली आणि शूट केलेली २-३ गाणी आताही तयार आहेत. खरं तर या महिन्यातच ती गाणी रिलीज होणार होती. पण काही कारणास्तव आता पुढच्या दोन-तीन महिन्यात आधी २ गाणी येतील. त्यानंतर आणखीही काही गाणी आहेत.", असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.