Pooja Banerjee : 'कुमकुम भाग्य' फेम पूजा बॅनर्जीच्या वडिलांचं निधन, पोस्ट शेअर करत म्हणाली-बाबा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:45 PM2022-12-06T12:45:59+5:302022-12-06T12:51:47+5:30
टीव्ही मालिका 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या वडिलांचं निधन झालंय.
![Kumkum bhagya show actress Pooja Banerjee father passed away actress shares emotional post on social media | Pooja Banerjee : 'कुमकुम भाग्य' फेम पूजा बॅनर्जीच्या वडिलांचं निधन, पोस्ट शेअर करत म्हणाली-बाबा... Kumkum bhagya show actress Pooja Banerjee father passed away actress shares emotional post on social media | Pooja Banerjee : 'कुमकुम भाग्य' फेम पूजा बॅनर्जीच्या वडिलांचं निधन, पोस्ट शेअर करत म्हणाली-बाबा...](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/poojaca21eb6-d9e4-4973-a697-36e39f54985b_202212922905.jpg)
Pooja Banerjee : 'कुमकुम भाग्य' फेम पूजा बॅनर्जीच्या वडिलांचं निधन, पोस्ट शेअर करत म्हणाली-बाबा...
टीव्ही मालिका 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पूजा तिचे पर्सनल ते प्रोफेशनल लाईफबाबतच्या अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. पूजाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय. वडिलांच्या निधनानंतर पूजाने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
4 डिसेंबर रोजी, अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या फोटोसह इंस्टाग्रामवर एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले, 'बाबा, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. मला माहित आहे की तू आता चांगल्या ठिकाणी आहेस. ओम शांती... तुमची कायम आठवण येईल - संदीप, सना, पूजा, नील आणि आकाश'. सोशल मीडियावर ही पोस्ट पाहून चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी पूजाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पूजा बऱ्याच दिवसांपासून टीव्ही जगतापासून दूर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेग्नेंसीमुळे तिने शो मध्येच सोडला होता. अलीकडेच पूजा आई झाली आहे. पूजा बॅनर्जी शेवटची टीव्ही शो 'कुमकुम भाग्य' मध्ये दिसली होती. पूजाने नकारात्मक भूमिकांमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अभिनेत्रीने एमटीव्ही 'रोडीज'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याला 'एक दससे से करते हैं प्यार हम' या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला ब्रेक मिळाला, जो त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर ती 'चंद्रकांता', 'चंद्र नंदिनी', 'दिल ही तो है', 'कसौटी जिंदगी की', 'कुमकुम भाग्य' यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये दिसली. तिने 'कहने को हमसफर हैं' मधून ओटीटीवर पदार्पण केलं.