Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:08 IST2025-09-23T13:04:21+5:302025-09-23T13:08:56+5:30
Katrina Kaif Announce Pregnancy: प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान कतरिनाची अधिकृत पोस्ट, चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज

Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
Katrina Kaif Announce Pregnancy: अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. तिचे काही फोटो, व्हिडिो व्हायरल झाले होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कतरिना कैफने स्वत: इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना बाळाला जन्म देणार आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना कैफ-विकी कौशल आईबाबा होणार आहेत.
अभिनेत्री कतरिना कैफचा मोठा चाहतावर्ग आहे. २०२१ मध्ये कतरिना आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकले. इंडस्ट्रीत आधी आलिया भट मग दीपिका आणि काही महिन्यांपूर्वीच कियारा अडवाणीनेही बाळाला जन्म दिला. तर काही दिवसांपासून कतरिनाही प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. विकीसोबत ती काही दिवसांपूर्वीच जेट्टीवर दिसली होती. तिने व्हाईट रंगाचा लूज आऊटफिट घातला होता. तेव्हापासूनच चर्चांना उधाण आलं होतं. आता कतरिनाने प्रेग्नंसीची ऑफिशियल घोषणा केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केला आहे. यात तिने व्हाईट ड्रेस घातला आहे. तर समोर विकी उभा आहे. दोघंही प्रेमाने, आनंदाने बेबी बंपकडे बघत आहेत. या फोटोची छोटी फ्रेम दोघांनी हातात धरली आहे.
'आनंदाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आयुष्यातील नवीन टप्प्याची सुरुवात करणार आहोत, ॐ' असं तिने कॅप्शन लिहिले आहे. कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. आधीपेक्षाही ती आणखी सुंदर दिसत आहे. विकी आणि कतरिनाची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे. एका पार्टीत दोघांची भेट झाली होती. त्यांनी गप्पा मारल्या आणि दोघं रोजच एकमेकांशी बोलायला लागले. हळूहळू प्रेमात पडले. विकीसोबत ऑनस्क्रीन जोडी चांगली दिसेल असं एकदा कतरिना एका शोमध्ये म्हणाली होती. स्क्रीनवर नाही मात्र दोघांची थेट आयुष्यातच जोडी जमली. २०२१ मध्ये त्यांचा राजस्थान येथे थाटात लग्नसोहळा पार पडला.