लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:52 IST2025-12-14T17:50:25+5:302025-12-14T17:52:52+5:30
आज मुंबईमध्ये आयोजित एका भव्य इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लियोनेल मेस्सीची भेट घेतली.

लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
अभिनेत्री करीना कपूर खानचे दोन्ही मुलं तैमूर आणि जेह फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचे मोठा चाहते आहेत. तैमूर त्याच्या शाळेतल्या फुटबॉल टीममध्येही आहे. तसंच तो कोणा अभिनेत्याचा नाही तर मेस्सीचा चाहता असल्याचं करीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तुझ्याकडे मेस्सीचा नंबर आहे का? असंही त्याने करीनाला विचारलं होतं. अखेर सर्वांचा लाडका खेळाडू मेस्सी भारतात आला आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली आहे. करीना कपूरही दोन्ही मुलांना घेऊन मेस्सीची भेट घेण्यासाठी निघालेली दिसत आहे.
आज मुंबईमध्ये आयोजित एका भव्य इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लियोनेल मेस्सीची भेट घेतली. करीनाने नुकताच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिचा मुलगा तैमूरने मेस्सी लिहिलेली जर्सी घातली आहे. तर छोट्या जेहने अर्जेंटिना लिहिलेली जर्सी परिधान केली आहे. दोघांच्याही जर्सीवर १० नंबर आहे. तिने दोघांचा हात पडकला आहे आणि हा पाठमोरा फोटो आहे. यानंतर इव्हेंटमध्ये खरोखर दोन्ही मुलांची आणि करीनाची मेस्सीशी भेट झाली. बेबोच्या मुलांसाठी हा मोठा फॅन मोमेंट होता हे नक्की.
लियोनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. आज १४ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर GOAT कप एक्झिबिशन मॅच होणार आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार आणि फूटबॉल खेळाडू यांच्यात हा सामना असेल. यानंतर एक फॅशन शो आणि ऑक्शनही होणार आहे. ज्यात फीफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये विजेता संघ अर्जेंटिनासंबंधी आणि मेस्सी संबंधी काही आठवणीतील वस्तूंची बोली लागणार आहे. या खास इव्हेंटसाठी करीना कपूर दोन्ही मुलांना घेऊन आलेली दिसत आहे. शिवाय अजय देवगणही मुलगा युगला घेऊन पोहोचला आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानने याआधी आपला लाडका मुलगा अबरामसोबत मेस्सीची भेट घेतली आहे.