"हे फक्त मोदीच करू शकतात..." भारतीय अर्थव्यवस्थेनं गरूड झेप घेताच कंगनाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:19 IST2025-05-25T17:09:01+5:302025-05-25T17:19:24+5:30

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची स्वप्ने बघणाऱ्या भारतीयांनी एक मैलाचा दगड पार केला आहे.

Kangana Ranaut React To India Surpasses Japan To Become World’s Fourth Largest Economy | "हे फक्त मोदीच करू शकतात..." भारतीय अर्थव्यवस्थेनं गरूड झेप घेताच कंगनाची प्रतिक्रिया

"हे फक्त मोदीच करू शकतात..." भारतीय अर्थव्यवस्थेनं गरूड झेप घेताच कंगनाची प्रतिक्रिया

भारताने मोठी आर्थिक झेप घेतली आहे. जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही घोषणा केली आहे. नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर सुब्रमण्यम यांनी हे सांगितले. ही बातमी समोर येताच सामान्यांपासून ते नेते आणि सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत हिनेदेखील आनंद व्यक्त केला आहे.

कंगना राणौतनं इंस्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान कपाळावर टिळक लावताना दिसत आहेत. या फोटोसोबत कंगनाने लिहिले, "अविश्वसनीय!! हे फक्त पंतप्रधान मोदीच करू शकतात. भारत जपानला मागे टाकत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारत ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनला आहे".  यासोबतच जर भारताने आपल्या योजनांवर दृढतेने काम केले, तर पुढील अडीच ते तीन वर्षांत ते जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं नीती आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटल्याचंही कंगनाने सांगितलं.

फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी पुढे 
सध्या, फक्त तीन देश भारताच्या पुढे आहेत. ते म्हणजे अमेरिका, चीन आणि जर्मनी. पण, भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्यामुळे येत्या काळात चित्र आणखी बदलू शकते.

४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती...
४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती असा प्रश्न सर्वांना पडला असणार, म्हणजे ४ ,०००अरब डॉलर. म्हणजेच भारतीय रुपयांत ४००,००० कोटी एवढे होतात. 
 

Web Title: Kangana Ranaut React To India Surpasses Japan To Become World’s Fourth Largest Economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.