नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 21:22 IST2021-02-07T21:19:50+5:302021-02-07T21:22:49+5:30
कट रचणाऱ्यांनी भारताचा चहाही सोडला नसल्याचं म्हणत टुलकिट खुलाशावरून केली होती टीका

नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या 'असोम माला' प्रकल्पाचाचा शुभारंभ करण्यात आला. याव्यतिरिक्त राज्यात दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी भूमिपूजनही करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधानांनी ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट खुलाशावरही उत्तर दिलं. तसंच कट रचणाऱ्यांनी भारताचा चहाही सोडला नसल्याचं म्हणत त्यांनी टीका केली होती. दरम्यान, यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
"नेहमीप्रमाणेच... फक्त चहाचीच चर्चा," असं म्हणत प्रकाश राज यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली.
As always......Sirf CHAI ka charcha.....#justaskinghttps://t.co/L7zSHWMavE
— Prakash Raj (@prakashraaj) February 7, 2021
काय म्हणाले होते मोदी?
"आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील," असंही त्यांनी नमूद केलं.
आमचा चहा बदनाम करण्यासाठी परदेशात कट; टुलकिट खुलाशावर पंतप्रधानांचा हल्लाबोल
आसामच्या भूमिवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचंही ते म्हणाले. "हिंसाचार, भेदभाव, तणाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टींना मागे सोजून आता संपूर्ण पूर्वोत्तर भाग विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. यामध्ये आसामनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक बोडो करारानंतर नुकतंच बोडोलँड भागातील निवडणुकांनंतर या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे," असं मोदी यांनी नमूद केलं.