ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:35 IST2025-05-27T16:33:54+5:302025-05-27T16:35:50+5:30

आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर लोपेझचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे

Jennifer Lopez hot video kissed background dancers of girl and boys one after the other on stage | ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस

ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस

काही महिन्यांपूर्वी उदित नारायण यांनी त्यांच्या म्यूझिक कॉन्सर्टमध्ये एका चाहतीला किस केलं आणि मोठा गदारोळ माजला. अशातच मनोरंजन विश्वातून अशीच एक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर लोपेझने भर कॉन्सर्टमध्ये किस केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इतकंच नव्हे पुरुष, स्त्री न बघता जेनिफरने बॅकग्राऊंड डान्सरला किस केलंय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

जेनिफरचा व्हायरल व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर AMA 2025 या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटमध्ये जेनिफरने 'डांस अगेन' या गाण्याचं स्लो व्हर्जन गाऊन परफॉर्मन्सला सुरुवात केली.  त्यानंतर या शोची झलक दाखवणारा एक व्हिडीओ सर्वांना दाखवण्यात आला. त्यानंतर जेनिफरने तिच्या डान्सने स्टेज दणाणून सोडलं. जेनिफरने अचानक डान्स करता करता आणि गाता गाता पुरुष आणि महिला बॅकग्राऊंड डान्सरला किस केलं. जेनिफरने डान्स करताना ग्लॅमरस आणि बोल्ड अदा दाखवल्या. जेनिफरच्या या व्हिडीओची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होतेय.

५५ वर्षीय जेनिफरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींना हा व्हिडीओ आणि जेनिफरचा डान्स परफॉर्मन्स आवडला असून गायिकेच्या धाडसी सादरीकरणाचं अनेकांनी कौतुक केलंय. तर काहींनी जेनिफरचं वय बघता तिने सर्वांसमोर असा बोल्ड परफॉर्मन्स दिल्याने तिच्यावर टीकाही केली आहे. जेनिफरची गाणी जगभरात प्रसिद्ध असून अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी हमखास असतात.

Web Title: Jennifer Lopez hot video kissed background dancers of girl and boys one after the other on stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.