'धुरंधर' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! अवघ्या ७ दिवसांत केली छप्परफाड कमाई, तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:51 IST2025-12-26T13:45:12+5:302025-12-26T13:51:31+5:30
बॉलिवूडला भरली धडकी! 'धुरंधर'च्या वादळातही टिकून आहे 'हा' सिनेमा, बॉक्स ऑफिसवर देतोय टक्कर, तुम्ही बघितला?

'धुरंधर' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! अवघ्या ७ दिवसांत केली छप्परफाड कमाई, तुम्ही पाहिला का?
Avatar Fire And Ash Beats Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीजच्या आधीपासूनच या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होती. या चित्रपटाबद्दल काही वादच झाले. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुरंधर अक्षरश: धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे काही निर्मात्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये बदल केल्याचं दिसत आहे. इतकंच नाहीतर याचा परिणाम कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या 'तू मेरा मै तेरी मै तेरी तू मेरा' सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही झाल्याचं दिसतंय. मात्र, असा एक असा चित्रपट आहे जो धुरंधरसमोर ताठ मानेने उभा आहे. याच चित्रपटाबद्दल जाणून घेऊया...
कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेच्या 'तू मेरा मै तेरी मै तेरी तू मेरा' या चित्रपटाबरोबर 'अवतार फायर एंड एश' हा बहुचर्चित चित्रपट १९ डिसेंबरला रिलीज झाला.व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने रंगवलेल्या पँडोरा नामक अद्भुत काल्पनिक विश्वाच्या या कथेनं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या आठवड्यातच या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. एकीकडे चित्रपटगृहांमध्ये धुरंधर धुमाकूळ घालत असतानाही, अवतारची क्रेझ काही कमी झालेली नाही.
जेम्स कॅमेरूनचा पहिला 'अवतार' हा सिनेमा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करत प्रेक्षकांसमोर कल्पनेतलं एक अद्भूत असं एक जग साकारल होतं. या चित्रपटाचे मागील दोन भागही प्रचंड यशस्वी झाले होते आणि त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आधीच्या चित्रपटांच्या प्रभावामुळेच, कोणतीही विशेष प्रसिद्धी नसतानाही, या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्याभरात बॉक्स ऑफिसवर १०९ कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर धुरंधर आणि 'अवतार फायर एंड एश' मध्ये काटें की टक्कर पाहायला मिळते आहे.